अकोला : 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:00 वाजताच्या दरम्यान नेहमीप्रमाणे आपल्या बोरगाव ते कोळंबी रोडला लागुन असलेल्या शेतात गेलेल्या अंदाजे ७० वर्षे वय असलेल्या बोरगाव खु. येथील गोदावरी बळीरामसा दत्तगाडे रा.बोरगाव रात्री बराच वेळ होऊनही घरी परतल्या नाहीत.
गोदावरी दत्तगाडे यांच्या शेताला लागुन असलेले शेतकरी डिगांबर लोडम हे रात्री आपल्या शेतात 8:00 वाजताच्या सुमारास कढाऊ पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता तेव्हा लोडम यांच्या विहीरीत एका महीलेचा मृतदेह तरंगताना दीसल्याने लोडम यांनी लगेच गावात पोलिस पाटलांशी संपर्क करुन माहिती दिली.
यावेळी पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार पडघान यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन राबविण्यासाठी पाचारण केले.
जिवरक्षक दीपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी कुलदीप जयस्वाल,ऋतीक सदाफळे, निखील ठाकरे हे शोध व बचाव साहित्य आणी रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहचले.
विहीर ही 70 फुट खोल आणी अर्ध्यातुन कच्ची व अंधार असल्याने सर्च ऑपरेशनला अडथळे निर्माण होत होते. शेवटी चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर गोदावरी दत्तगाडे यांचा मृतदेह रात्री 1:00 वाजता शोधुन बाहेर काढ्यात त्यांना यश आलं.
यावेळी पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार एपीआय पडघान, बी.ज.सोळंके, तसेच पोलिस कर्मचारी व बोरगाव खु.येथील पोलिस पाटील.चोपडे यांच्यासह नातेवाईक तथा गावकरी हजर होते.अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.