वाशिंग्टन : अमेरिकेतील ज्यो बायडेन प्रशासनात मूळ भारतीय वंशांच्या व्यक्तींना महत्त्वाच्या पदांवर नियुक्त केले जात असून, आता किरण आहुजा यांना प्रशासनातील कार्मिक व्यवस्थापन प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे.येथील कार्मिक व्यवस्थापन कार्यालय हे अमेरिकेतील 20 लाखांहून अधिक नागरी सेवा अधिकार्यांच्या व्यवस्थापनाचे काम करते. 49 वर्षीय किरण आहुजा यांच्या नामांकनाला सिनेटमध्ये मंजुरी मिळाली, तर या पदावर जाणार्या त्या पहिल्या भारतीय-अमेरिकन असतील.
2015 ते 2017 या कार्यकाळात त्यांनी कार्मिक व्यवस्थापन कार्यालयाच्या संचालक म्हणून कार्य केले आहे. त्यांना दोन दशकाहून अधिक काळ कामाचा अनुभव आहे. सध्या त्या अमेरिकेतील फिलॅनथॉपी नॉर्थवेस्ट या संघटनेच्या मु‘य कार्यकारी अधिकारी आहे. ही संस्था येथे परोपकारी संस्थांचे नेटवर्क विणण्याचे काम करते. आहुजा यांनी अमेरिकेतील कायदा मंत्रालयात नागरी अधिकारांचे वकील म्हणून आपल्या कारकीर्दीस प्रारंभ केला होता. ओबामा व बायडेन प्रशासनात त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये कार्यकारी संचालक म्हणूनही कार्य केले आहे. त्यामूळ जॉर्जियातील असून, त्यांचे शिक्षण स्पेलमॅन महाविद्यालयात झाले, त्यांनी राजकीय विज्ञान विषयात पदवी प्राप्त केली आहे.