पाथर्डी(प्रतिनिधी)- तालुक्यातील पाथर्डी येथे शिव जयंती चे ओचित्य साधून नेहरू युवा मंडळ,अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने विवेकानंद युवा बहुद्देशीय मंडळ पाथर्डी च्या वतीने वक्तृत्व स्पर्धे चे आयोजन श्री गजानन महाराज कनिष्ठ महाविद्यालय प्रांगणात करण्यात आले होते.या स्पर्धे साठी शिवराज्य,कोरोना मुक्त असा विषय घेऊन स्पर्धकांना दहा मिनिटांचा वेड देण्यात आला होता.शासनाने कोरोना मुडे घालून दिलेल्या सर्व नियमांच्या चोकटीत ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धे साठी ऐकून पाच पारितोषिक ठेवण्यात आले होते.स्पर्धे मध्ये भर भरून स्पर्धकांनी भाग घेऊन वैचारीक शिवजयंती साजरी केली.
या स्पर्धे चे उदघाटन श्री सुरेशभाऊ गुजर यांनी केले.तर परीक्षक म्हणून श्री गायकवाड सर,मनोज जाधव सर ,गोवर्धन कुकडे सर, मोहोड मॅडम, नेहरू युवा केंद्र तेल्हारा तालुका समन्वयक प्रदीप उर्फ बंटी राऊत उपस्तीत होते. या नंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता तर या यास स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक हा आरती मामनकार, दुतीय अस्विनी धारपवार,तृतीय क्रांती तेलगोटे, चतुर्थ प्रगती मोडोकार, पाचवा ऋतुजा भड तर प्रोत्सान पर बक्षीस हे वेदांत कुकडे यांना देण्यात आले.
या कार्यमाचे संचालन क्रांती तेलगोटे व प्रगती मोडोकार यांनी तर आभार प्रदर्शन विवेकानंद युवा बहुद्देशीय मंडळाचे अध्यक्ष प्रदीप उर्फ बंटी राऊत यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यमाला यशस्वी करण्यासाठी वैभव भराटे, अजय भिसे,दिनेश गुजर,शाम जामोदे, गौरव इंगळे,नागेश पाथरकर,वैष्णवी खंडेराय,श्रद्धा राऊत व विवेकानंद मंडळाचे कार्यकर्ते उपस्तीत होते.