• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

हिवरखेड ग्रामपंचायत 55 लाखाचे अफरातफर प्रकरण… दोन माजी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यावर अखेर गुन्हे दाखल

Team by Team
February 21, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
84 1
0
विधान परिषदेत गाजला हिवरखेड नगरपंचायतचा मुद्दा,आ. मिटकरींनी उचलले अकोला जिल्ह्यातील अनेक विषय
13
SHARES
607
VIEWS
FBWhatsappTelegram

हिवरखेड(धीरज बजाज)- अकोला जिल्ह्यातील हिवरखेड ग्रामपंचायत मधील विविध प्रकरणातील एकूण 50 लक्ष रुपयाच्या अपहार प्रकरणी हिवरखेड च्या माजी सरपंच सौ शिल्पाताई मिलींद भोपळे, ग्रामविकास अधिकारी भीमराव गरकल यांच्यावर आणि जवळपास 5 लक्ष रुपयाच्या LED लाईट प्रकरणात माजी सरपंच सौ. अरुणाताई सुरेश ओंकारे आणि गरकल यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. हिवरखेड ग्रामपंचायत मधील लक्षावधी रुपयांची अफरातफर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुद्धा सुरू होते.

उच्च न्यायालयाने खडसावल्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संदर्भीय आदेशान्वये तेल्हारा चे गटविकास अधिकारी यांनी जि.प. विस्तार अधिकारी सतीश सरोदे यांच्या नावे पत्र लिहून तत्कालीन सरपंच सौ शिल्पाताई मिलिंद भोपळे आणि ग्रामविकास अधिकारी भीमराव गरकल या दोघांकडून फेर चौकशीत मूल्यांकनात वाढ होऊन तब्बल 50 लक्ष 43 हजार 511 एवढी रक्कमेचा अपहार चौकशीत सिद्ध झाल्याने या पन्नास लाखाच्या वासुलपात्र रकमेच्या वसुलीसाठी आरोपींवर फौजदारी कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. सोबतच तत्कालीन दुसऱ्या माजी सरपंच सौ अरुणाताई सुरेश ओंकारे यांच्या कार्यकाळात एलईडी खरेदी प्रकरणात जवळपास 5 लक्ष रुपये अनियमितता झाली असल्याचे चौकशीत आढळले होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सतीश सरोदे यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार तत्कालीन सरपंच सौ. शिल्पा मिलिंद भोपळे आणि ग्राम विकास अधिकारी भीमराव गरकल यांनी शासनाच्या 14 व्या वित्त आयोगाच्या सन 2016-17 आणि सन 2017-18 च्या मंजूर आराखड्यातील कामे सन 2018-19 या आर्थिक वर्षात केली व सन 2016-2017-2018 च्या कामाकरिता एकूण रक्कम एक कोटी सदोतीस लक्ष वीस हजार सातशे त्रेचाळीस रुपये बँक खात्यातून काढले. पण ग्रामपंचायत येथील मोजमाप पुस्तकामध्ये 82,62,914 चे मूल्यांकन प्राप्त असून एकूण 50,43,511 रुपयांची तफावत आढळली आहे. सदर रकमेचे प्रत्यक्ष काम झालेले नाही. सदरच्या शासकीय निधीचा तत्कालीन सरपंच सौ. शिल्पाताई मिलिंद भोपळे व ग्रामविकास अधिकारी भीमराव गरकल यांनी संगणमत करून त्याचा अपहार केला आणि शासनाची फसवणूक करून सदरची रक्कम स्वतःचे फायदयाकरिता वापरली. अशा मजकुराची लेखी फिर्याद दिल्यामुळे हिवरखेड पोलिसांनी आरोपी सौ शिल्पा मिलिंद भोपळे आणि ग्राम विकास अधिकारी भीमराव गरकल यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 409 420 34 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास ठाणेदार धिरज चव्हाण यांच्या नेतृत्वात हिवरखेड पोलीस करीत आहेत.

दोन माजी महिला सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे हिवरखेड सह संपूर्ण अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

 

 

एल ई डी लाईट प्रकरणात सुद्धा गुन्हे दाखल
हिवरखेड ग्रामपंचायत क्षेत्रात एलईडी लाईट खरेदी करताना खात्री न करता खोट्या दस्तावेजाच्या आधारे मे. गजानन इलेक्ट्रिकल्स पुणे यांना देयक अदा केले. त्यामुळे 4,74,779 रुपयाचे ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता झाली. म्हणून सरपंच सौ अरुणाताई सुरेश ओंकारे आणि ग्राम विकास अधिकारी गरकल यांनी संगनमत करून शासकीय रकमेचा अपहार करून सदरची रक्कम स्वतःचे फायदयाकरिता वापरली अशी फिर्याद विस्तार अधिकारी सतीश सरोदे यांनी दिल्याने हिवरखेड पोलिसांनी तत्कालीन सरपंच सौ अरुणाताई सुरेश ओंकारे आणि ग्रामविकास अधिकारी भीमराव गरकल यांच्यावर भा.द.वि. 409 420 34 नुसार गुन्हे दाखल केले आहेत.

Tags: हिवरखेड ग्रामपंचायत
Previous Post

शिवजयंती निमित्य लोकजागर मंचचा अनोखा सामाजिक उपक्रम

Next Post

विवेकानंद युवा मंडळ च्या वतीने शिवजयंती दिनी वक्तृत्व स्पर्धा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
विवेकानंद युवा मंडळ च्या वतीने  शिवजयंती दिनी वक्तृत्व स्पर्धा

विवेकानंद युवा मंडळ च्या वतीने शिवजयंती दिनी वक्तृत्व स्पर्धा

शिवजयंतीचे औचित्य साधुन घेतला सरंपच उपसरपंच यांणी पदभार

शिवजयंतीचे औचित्य साधुन घेतला सरंपच उपसरपंच यांणी पदभार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.