• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

व्यापारी संघटनांची बैठक: सर्व व्यावसायिकांच्या कोविड चाचण्या करण्याचे निर्देश

Team by Team
February 20, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
व्यापारी संघटनांची बैठक: सर्व व्यावसायिकांच्या कोविड चाचण्या करण्याचे निर्देश
37
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्याच्या कार्यपद्धतीचा एक भाग म्हणून शहरातील सर्व व्यापारी, दुकानदार त्यांच्याकडे काम करणारे कामगार, कर्मचारी या सगळ्यांच्या कोविड चाचण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या,असे निर्देश आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. यासाठी व्यापारी संघटनांनी व्यावसायिकांची व कामगार कर्मचाऱ्यांची माहिती प्रशासनाला उपलब्ध करुन द्यावी,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात सर्व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी पापळकर यांच्या सह पोलीस अधीक्षक जी. श्रीधर,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी  मुकेश चव्हाण, मनपाचे प्रभारी आयुक्त पंकज जावळेकर, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम आदी उपस्थित होते. तसेच या बैठकीस एमआयडीसी असोसिएशन,  होलसेल व्यापारी असोसिएशन, ग्रन मर्चंट असोसिएशन,  मंगल कार्यालय चालक असोसिएशन,  किराणा मर्चंट असोसिएशन, एलपीजी वितरक असोसिएशन,  केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन,  हॉटेल असोसिएशन, केटरर्स असोसिएशन इ. विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

यावेळी जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, कोविड संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी अवलंबावयाच्या कार्यपद्धतीनुसार दिवसभरात अनेक लोकांच्या संपर्कात येणारे विविध दुकानदार, त्यांचे नोकर इ. च्या चाचण्या होणे आवश्यक आहे. त्यासाठी व्यापारी असोसिएशनने प्रशासनाला असोसिएशन निहाय चाचण्यांचे वेळापत्रक तयार करुन द्यावे. या चाचण्यांसाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत. याशिवाय वृत्तपत्र विक्रेतेम हॉकर्स, दुधवाले यांच्या सारख्या  घरोघरी जाणाऱ्या घटकांच्याही चाचण्या करण्याचे नियोजन प्रशासन करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंगल कार्यालयाच्या चालकांनी विवाह आयोजकांची लेखी हमी घ्या व ५० पेक्षा अधिक एकही व्यक्ती अधिक उपस्थित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल. याशिवाय बाहेर रस्त्यावर फिरणारे, फेरीवाले यांच्यावर कोविड प्रतिबंध उल्लंघनाबाबत प्रशासन कारवाई करीतच आहे. सोने दागिने व लग्नाच्या बस्ता खरेदीसाठीही पाच पेक्षा अधिक लोक येणार नाहीत याची दक्षता स्वतः दुकान चालकांनी घ्यावयाची आहे.,असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. एलपीजी ग्राहकांनी शक्यतो एजन्सीवर जाऊन सिलिंडर घेण्यापेक्षा ऑनलाईन बुकिंग करुन सिलिंडर मागवावे अशी सुचनाही  वितरकांनी केली होती , त्यावर सुचना योग्य असल्याचे सांगुन गॅस ग्राहकांनी ऑनलाईन बुकींगचा पर्याय अवलंबावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीतही येणारे लोक हे मास्क शिवाय येणार नाहीत याची खबरदारी बाळगण्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाचा आजार झाला किंवा आपल्या जवळपासच्या व्यक्तिला झाला ह्याची माहिती लपवणे हे सुद्धा महाग पडू शकते,असेही त्यांनी सांगितले व प्रत्येक दुकानदाराने आपले नोकर, कामगार यांच्याबद्दलची माहितीही  नोंदवून ठेवावी,असे सांगितले.

व्यापारी असोसिएशनच्या प्रतिनिधिंनी सांगितले की,  आपल्या दुकानात येणारा प्रत्येक ग्राहक हा मास्क लावूनच येईल याची दक्षता घेऊ, चाचण्यांसाठी आवश्यक माहितीचे संकलन करुन ती ही प्रशासनाला पुरविण्यात येईल,अशी हमीही यावेळी उपस्थित व्यापाऱ्यांनी दिली.

Tags: collector meeting akola
Previous Post

कोरोना नियमांचे उल्लंघन :अकोला शहरात १४४ जणांविरुध्द दंडात्मक कारवाई

Next Post

वाडी अदमपुर येथे शिवजयंती निमित्य रक्तदान शिबीर संपन्न

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
वाडी अदमपुर येथे शिवजयंती निमित्य रक्तदान शिबीर संपन्न

वाडी अदमपुर येथे शिवजयंती निमित्य रक्तदान शिबीर संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांचे तारणहार होते- भीमराव परघरमोल सर

छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांचे तारणहार होते- भीमराव परघरमोल सर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.