तेल्हारा (किशोर डांबरे)– तेल्हारा येथील छत्रपती प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवजयंती निमित्ताने मरणोत्तर नेत्रदान संकल्प शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती प्रतिष्ठान च्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते या वर्षी कोरोना महामारीचे चे संकट असल्याने यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे आयोजन छत्रपती प्रतिष्ठान द्वारे करण्यात आले . यावर्षी शिवजयंती निमित्ताने मरणोत्तर नेत्रदान संकल्प अभियानात तेल्हारा शहरातील.51 नेत्रदात्यांनी मरणोत्तर नेत्रदान अर्ज भरून संकल्प केला.
सर्वप्रथम छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतड्याला हारपर्ण करण्यात आले यावेळी तेल्हारा तहसील चे तहसीलदार गुरव साहेब ,ठाणेदार शेळके साहेब, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक तापडिया, डॉ.मुरकर नगराध्यक्षा जयश्री पुंडकर, पोलीस उपनिरीक्षक देशमुख, प्रा.दबडघाव सर, कायंदे साहेब यांची उपस्थिती होती. यावेळी वैद्यकीय अधिकरी तापडिया यांनी नेत्रदाते यांना मार्गदर्शन केले.तेल्हारा तहसील चे तहसीलदार गुरव यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं. व लॉक डाऊन च्या काळात तेल्हारा शहरातील अनेक सामाजिक उपक्रम करणाऱ्या मंडळाचा सत्कार सुद्धा यावेळी करण्यात आला त्यात सेवाभावी समिती, जय बजरंग मंडळ.आसरा माता मंडळ यांचा सत्कार गौरव पत्र व शाल श्रीफळ देऊन श्री छत्रपती प्रतिष्ठान द्वारे करण्यात आला.
शिवसंकल्प मरणोत्तर नेत्रदान
या अभिनव उपक्रमात पोलीस उप निरीक्षक निलेश देशमुख,प्रा. दबडघाव ,रामा फाटकर, किशोर डांबरे,सचिन थाटे, शिवानी थाटे,माया थाटे, माधुरी थाटे, सौ. जयश्री पुडकर,सुनील राठोड,गजानन गायकवाड, आरती गायकवाड,नंदकिशोर मुंजाळे, स्वप्नील सुरे, दीपा ठाकरे,महेश सुरे,आशिष देशमुख,प्रणय देशमुख, रेणुका देवकते, उज्वला सकारकर, विशाल दामोदर,भैया देशमुख,रेखाताई डांबरे,अशोक गव्हाळे ,कल्पना देशमुख,रंजना ढाले,,शुभम सोनटक्के,प्रशिष्य दामोदर,चेतन पिंजरकर, कोलिळा खेट्टे,चदा साबळे,पूनम इंगळे,परमेश्वर इंगळे,डॉ.धीरज नजान,संघर्ष बोदडे,सुरज देशमुख,रेंकू खाडे, गोकुळ हिंगणकार, भूषण ठाकरे, आशिष खाडे, रुपाली मुंजाळे,अनिता वाडेकर,शिवहरी खेट्टे,गौरव धुळे, गोविद चौधरी, प्रदीप राजुस्कर, यांनी नेत्रदान संकल्प केला आहे .
या शिवजयंती निमित्ताने आयोजित अनोख्या कार्यक्रमाची सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच लॉक डाऊन च्या काळात तेल्हारा शहरातील अनेक सामाजिक उपक्रम करणाऱ्या मंडळाचा सत्कार सुद्धा करण्यात आला त्यात सेवाभावी समिती, जय बजरंग मंडळ.आसरा माता मंडळ यांचा सत्कार श्री छत्रपती प्रतिष्ठान द्वारे करण्यात आला. त्याच डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने आयोजत ऑनलाइन चित्रकला व निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण सुद्धा यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला तेल्हारा शहरातील शिवप्रेमी उपस्थित होते .