तेल्हारा – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने तेल्हारा येथील छत्रपती प्रतिष्ठान यांच्या वतीने दि 19 फेब्रुवारी 2021 ला मरणोत्तर नेत्र दान संकल्प अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे .
तेल्हारा येथील छत्रपती प्रतिष्ठान च्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते या वर्षी कोरोना महामारीचे चे संकट असल्याने यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे आयोजन छत्रपती प्रतिष्ठान ने केले आहे . यावर्षी शिवजयंती निमित्ताने मरणोत्तर नेत्रदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला तेल्हारा शहरातील जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे जवळपास 50 नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदान संकल्प करण्यासाठी नोंदणी केली आहे .यामध्ये महिलाची संख्या लक्षणीय आहे .मरणोत्तर नेत्र दान मुळे असंख्य अंधव्यक्ती सुदर असे विश्व बघू शकतील असा मानस छत्रपती प्रतिष्ठान चा आहे.
या मरणोत्तर नेत्रदान शिबीरामध्ये जास्तीत जास्त लोकांनी हा संकल्प करावा असे आवाहन श्री छत्रपती प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.