अकोला: सन 2009 च्या तुकडीतील भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी जी.श्रीकांत यांनी आज दिनांक 17.02.2021 रोजी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या अकोला येथील मुख्य कार्यालयात रुजू होवून व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्विकारला. महाबीज मध्ये रुजू होण्यापूर्वी जी.श्रीकांत हे लातूर येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी ते सन 2015 ते 2017 पर्यंत अकोला येथे सुध्दा जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. शासनाने त्यांची बदली महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक या पदावर केल्यामुळे अकोला शहरातील त्यांची दुसऱ्यांदा पदस्थापना होय हे विशेष.
रुजू झाल्या झाल्या त्यांनी विभाग प्रमुखांसमवेत कामकाजाचा आढावा घेवून आगामी खरीप हंगाम यशस्वीते करिता नियोजनाचे दृष्टीने आवश्यक ते निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी डॉ.लहाने, महाव्यवस्थापक (प्रशासन), श्री.कुचे, महाव्यवस्थापक (विपणन), श्री.यादव महाव्यवस्थापक (वित्त), श्री.शेख व प्रबोध धांदे आदी उपस्थित होते