तेल्हारा – कोणतीही कालमर्यादा न ठेवता सर्व समाजातील शिधापत्रिका धारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चा तेल्हारा शहर च्या वतीने जिल्हाधिकारी अकोला यांना दि 12 फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनातून देण्यात आला. तालुका अध्यक्ष गजानन उंबरकार,जिल्हा सरचिटणीस केशव ताथोड,शहर अध्यक्ष महेंद्र गोयनका यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजयुमो शहर अध्यक्ष गणेश इंगोले यांच्या नेतृत्वात सदर निवेदन तेल्हारा तहशील कार्यालयामार्फत देण्यात आले.
केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 दि 5 जुलै 2013 पासून लागू केला आहे अधिनियमानुसार राज्यासाठी 76.32 टक्के (469.71लक्ष)व45.34टक्के शहरी(230.45 लक्ष) अशी एकुण 7.16 लक्ष लाभार्थी संख्या नियमित करण्यात आली आहे सदर नियमाची अंमलबजावणी राज्यात 1 फेब्रुवारी 2014 पासून करण्यात आली आहे संदर्भ दि 17.12 2011 शासन निर्णय ग्रामीण व शहरी भागाकरिता जिल्हानिहाय लाभार्थी देण्यात आला असून संदर्भ 24 मार्च 2015, दि13 जानेवारी 2016, 3 मार्च 2017,16नोव्हेंबर 2018 च्या शासन निर्णयान्वये वेळोवेळी सुधारित जिल्हानिहाय इष्टांक देण्यात आला आहे या योजनेत जास्तीत जास्त लाभार्थ्यांचा समावेश होण्याच्या दृष्टीने 22 फ्रेब्रुवारी 2019 शिधापत्रिका राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत घेण्यात आला परंतु सदर सुधारित काम मर्यादेनंतर देखील 16 नोव्हेंबर 2018 अन्वेय दिलेल्या सुधारित स्थानकाची पूर्ती होत नसल्याने 30 जून 2019 पर्यंत च्या शिधापत्रिका यांचा समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती व तसा निर्णय शासनाने घेतला परंतू यांत ज्या शिधापत्रिका नव्याने बनवतील त्यांचाही या योजनेत समावेश करुन लाभ मिळावा असेही निवेदनात नमूद आहे. निवेदनावर शहर सरचिटणीस रवी गाडोदिया,उपाध्यक्ष विजय देशमुख, सहकार आघाडी तालुका अध्यक्ष अतुल विखे,न.प सदस्य सुनील राठोड, तालुका प्रसिद्धी प्रमुख रवि शर्मा, जिल्हा सचिव सुमित गंभिरे, भाजयुमो ता सरचिटणीस रफिक कुरेशी,विजय बोर्डे, जि प सर्कल प्रमुख राजेश बुरघाटे, राहुल झापर्डे,रामरतन सुशिर,भरत जोशी, अमोल मुरकुटे,ऋषभ ठाकूर,शुभम पारधे, राजा कुरेशी यांच्या सह्या आहेत.