तेल्हारा : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींची निवडणूक गुरुवारी पार पडली. या निवडणुकीत १७ पैकी १३ ग्रामपंचायतींच्या कारभाराची सूत्रे महिलांकडे आली आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातही तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांचे वर्चस्व दिसून आले. एक ग्रामपंचायतीत उमेदवार नसल्याने सरपंच पद रिक्त आहे.
हिवरखेड येथे गुप्त मतदान घेण्यात आले. यामध्ये सरपंचपदी सीमा संतोष राऊत, उपसरपंचपदी रमेश सदाशिव दुतोंडे यांची निवड झाली. सौंदळा सरपंचपदासाठी अनु. जमातीचा उमेदवार नसल्याने पद रिक्त राहिले. उपसरपंचपदी विनोद वासुदेव मिरगे यांची बिनविरोध निवड झाली. दानापूर येथे ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. सपना धम्मपाल वाकोडे यांच्या नावाने ईश्वर चिठ्ठी निघाल्याने, त्यांची सरपंचपदी, तर उपसरपंचपदी सागर रामकृष्ण ढगे यांची निवड झाली. वाडी अदमपूर येथेही गुप्त मतदान झाले असता, सरपंचपदी रूपेश वल्लभदास राठी, उपसरपंचपदी मीना विष्णू शेळके, बेलखेड येथे दोन्ही गटासाठी मोठ्या प्रतिष्ठेची निवडणूक होती. निमकर्डे गटाचे नऊ उमेदवार निवडून आले. फोडाफोडीचे राजकारण झाल्याने, त्यांचा एक सदस्य फुटला. मात्र तरीही निमकर्डे गटाने ८ विरुद्ध ७ मतांनी बाजी मारली. सरपंचपदी रत्नमाला अरविंद वरठे, उपसरपंचपदी नंदकिशोर शामराव निमकर्डे यांची वर्णी लागली. अडगाव बु. येथे सरपंचपदी शोभा रमेश खंडारे, उपसरपंचपदी अली मजहर अली मुज्जफर यांची बिनविरोध निवड झाली. शिवाजीनगर सरपंचपदी गायत्री नितीन कुमार चिम, उपसरपंचपदी गुलाम आरिफ गुलाम रब्बानी, सिरसोली येथे हात वर करून मतदान घेण्यात आले. सरपंचपदी सारिका प्रवीण वानरे, उपसरपंचपदी उषा हरिभाऊ नागमते, घोडेगाव सरपंचपदी अर्चना किशोर बुंदे, उपसरपंचपदी नासिर उल्लाखा शफावत उल्लाखा यांची बिनविरोध निवड झाली. भांबेरी येथेही गुप्त मतदान झाले. सरपंचपदी माधुरी श्रीकांत काळे, उपसरपंचपदी चंदा विठ्ठल भारसाकळे, अडसूळ बिनविरोध सरपंचपदी देवानंद वासुदेवराव नागळे, उपसरपंचपदी अनंत बाळकृष्ण नवलकार, खेल देशपांडे येथे गुप्त मतदान झाले असता, सरपंचपदी शेख अफरोजबी यासीन, उपसरपंचपदी अनिल दगडोजी भाकरे यांची निवड झाली. खेल सटवाजी बिनविरोध सरपंचपदी रेहान खान सैफुललाखान, उपसरपंचपदी वंदना गणेश वाकोडे, मनब्दा बिनविरोध सरपंचपदी सुनीता प्रदीप पाथरीकर, उपसरपंचपदी शेषराव शालीग्राम पोहरकार, नर्सिपूर बिनविरोध- सरपंचपदी नबी तालेमुन बी गुलाम, उपसरपंचपदी वैशाली शंकर माहोरे, तळेगाव वडनेर बिनविरोध- सरपंचपदी भारती शिवशंकर डिगोळे, उपसरपंचपदी ज्ञानेश्वर पंजाबराव अमझरे, वरुड बु. बिनविरोध सरपंचपदी अनुराधा गणेश बुंदे, उपसरपंचपदी मीरा सतीश शेळके यांची वर्णी लागली. तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार राजेश गुरव, तेल्हारा ठाणेदार दिनेश शेळके, हिवरखेड ठाणेदार धीरज चव्हाण यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.