तेल्हारा(प्रतिनिधी)– नगर पालिकेच्या सभापती पदाच्या निवडणुका आज दिनांक १० फेब्रुवारी रोजी तहसिलदार डॉ संतोष येवलीकर याच्या अध्यक्षतेखाली व तेल्हारा नगरपालिका अध्यक्ष सौ जयश्रीताई पुडकर यांच्या उपस्थितीत पार पडल्या आहेत.
यामध्ये स्वच्छता वैद्यकीय व आरोग्य समिती सभापती पदी सौ मालुताई सुभाष खाडे यांची निवड करण्यात आली तर समिती सदस्य पदी नरेश त्र्यबक आप्पा गंभीरे, प्रतापराव देशमुख ,गनीशहा इस्माईल शहा, गोवर्धन पोहरकार तर शिक्षण सभापती पदी सौ दुर्गा भटकर यांची निवड करण्यात आली तर सदस्य पदी राजेश खारोडे ,सौ नलुताई तायडे सुनिल राठोड,सौ दीपाली धनभर, यांची निवड करण्यात आली महीला व बालकल्याण सभापती पदी सौ आरती गायकवाड सौ सिमा पिवाल सौ नलुताई तायडे, सौ अरुणा मंगेश ठाकरे यांची निवड करण्यात आली सार्वजनिक बांधकाम नियोजन व विकास समिती सभापती पदी मंगेश सोळंके यांची निवड करण्यात आली सदस्य पदी राजेश खारोडे सौ सिमा पिवाल सुनील राठोड सौ सुनिता भुजबले यांची निवड करण्यात आली आहे पाणी पुरवठा व जल निस्तारण समिती सभापती पदी कैलास ठोकणे यांची निवड करण्यात आली तर सदस्यपदी प्रतापराव देशमुख नरेश आप्पा गंभीरे धनंजय निळकंठ मार्के मितेश मल्ल यांची निवड करण्यात आली स्थायी समिती सभापती पदी सौ जयश्रीताई पुडकर तर सदस्य पदी सौ मालुताई खाडे कैलास ठोकणे मंगेश सोळंके सौ दुर्गा भटकर सौ आरती गायकवाड यांची निवड करण्यात आली