वाडेगांव (डॉ चांद शेख) – मौजा वाडेगाव येथे दि ९ फेबुवारी रोजी ग्रा पं सरपंच तथा उपसरपंच निवडणुक घेण्यात आली या निवडणुकीत वाडेगांव विकास आघाडीचे सर्व मार्गदर्शक व सिल्पकार चंद्रशेखर चिंचोलकार, जि.प. सदस्य अकोला, शामलाल जी लोध , मायादेवी लोध माजी पंसं सभापती, प्रशांत सेठ पल्हाडे , गोपाल सेठ राऊत युवा नेते वंचीत बहुजन आघाडी, डिंगाबर भुस्कुटे, ज्ञानदेव मसने, अरूण देशमुख , बंडू भाऊ ठोंबरे,भगवान जंजाळ, जितेंद्र डोंगरे, शिवलाल घाटोळ, रमेश जिंचोलकार, प्रशांत मानकर,गुलाब लोखंडे, पाडूभाऊ लोखंडे यांनी सहकार्य केले, यावेळी निवडणुक अधिकारी अरूण मुंदडा तर त्यांना सहकारी ग्रा पं सचिव भारसाकळे तलाठी ताथोड हे होते निवडणुक शांततेत पार पडली. यावेळी वाडेगांव विकास आघाडी चे सरपंचपदी मंगेश शामराव तायडे ( मेजर ) तर उपसरपंचपदी सुनिल प्रभाकर घाटोळ हे विजयी झाले. यावेळी यांना ११ मते मिळाली तर विरोधी गटाला ६ मते मिळाली पोलीसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. , यावेळी नवनिर्वाचीत सरपंच मंगेश तायडे, उपसरपंच सुनिल घाटोळ, ग्रा. पं . सदस्य सौ . प्रज्ञा राजकुमार अवचार , सौ. अर्चना प्रकाश मसने, सचिन धनोकार, सौ. मंदा सुनिल मानकर, सौ. रूपाली अंकुश शहाणे, सौ. खैरुन्नीसा डॉ. शेख चांद, म .हनीफ अब्दुल गफ्फार, राजेश्वर अरुण पळस्कार, सौ. किर्ती सतीश सरप या सर्वांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिला सदस्य पती प्रकाश मसने, सुनिल मानकर, राजकुमार अवचार , डॉ . शेख चांद, अंकुश शहाणे, सतीश सरप या सर्वांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वाडेगांव विकास आघाडी व परीवर्तन पॅनल चे सर्व प्रमुख व सदस्य उपस्थीत होते. तसेच प्रतिष्ठीत नागरीक, पदाधीकारी, कार्यकर्ते, युवक, महीला तसेच गावकरी उपस्थीत होते.