• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

New Labour Act : कर्मचार्‍यांना आठवड्यातून 3 दिवस सुट्टी मिळणार !

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
February 9, 2021
in Featured, नोकरी, फिचर्ड
Reading Time: 1 min read
83 3
0
New Labour Act ! कर्मचार्‍यांना आठवड्यातून 3 दिवस सुट्टी मिळणार ?
29
SHARES
611
VIEWS
FBWhatsappTelegram

नवीन कामगार कायद्यांतर्गत येत्या काही दिवसांत कर्मचार्‍यांना आठवड्यातून तीन दिवस सुट्टी दिली जाण्याची शक्यता आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालय या आठवड्यात चार नवीन कामगार कायदे लागू करण्यासाठी त्यांच्याशी संबंधित नियमांना अंतिम रूप देऊ शकते. हे कायदे लागू करून देशाच्या कामगार क्षेत्रात सुधारित नियम आणि कायद्यांचे नवीन पर्व सुरू होणार आहे. आराखडा अंतिम झाल्यामुळे कर्मचार्‍यांना आठवड्यातून चार कामकाजाचे दिवस असतील आणि त्यासोबत तीन दिवस रजा मिळेल.

कामगारांच्या नोंदणी आणि कल्याणासाठी मंत्रालय इंटरनेट पोर्टल तयार
याशिवाय असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नोंदणी आणि कल्याणासाठी मंत्रालय इंटरनेट पोर्टल तयार करत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे पोर्टल जूनपर्यंत तयार होऊ शकेल. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी नोंदणी आणि इतर सुविधा या पोर्टलवर देता येतील. यामध्ये कंत्राटी कामगार, प्लॅटफॉर्म कामगार यांसारख्या कामगारांची नोंदणी केली जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणात अशा वेब पोर्टलच्या स्थापनेचा उल्लेख केला होता.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

चार कामगार कायदे 1 एप्रिल 2021 पासून लागू होतील
कामगार सचिव अपूर्व चंद्र म्हणाले, नियम तयार केले जात असून, येत्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. यासंदर्भात सर्व संबंधितांशी चर्चा झालीय. लवकरच हे कामगार मंत्रालय चार नवीन कायदे लागू करण्याच्या स्थितीत असेल. यामध्ये पगार/वेतन कोड, औद्योगिक संबंधांचे कोड, कामाशी संबंधित सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणी अटी (ओएसएच) आणि सामाजिक सुरक्षा असा कायद्यांचा समावेश असेल. कामगार मंत्रालय एप्रिलपासून चार कायद्यांची अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे.

4 कोडमध्ये 44 प्रकारचे जुने कोड
कामगार कायदे सुधारण्यासाठी मंत्रालयाने एकूण 44 प्रकारचे जुने कामगार कायदे चार कायद्यांमध्ये एकत्रित केले आहेत आणि अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. कामगार मंत्रालयाला हे कायदे एकाच वेळी राबवायचे आहेत.

सरकार पोर्टल तयार करतंय
पोर्टलबाबत चंद्र यांनी सांगितले की, पोर्टल तयार करण्याचे काम प्रगतिपथावर असून, ते जूनपर्यंत सुरू करता येईल. या पोर्टलवर अल्प मुदतीवरील कंत्राटे किंवा कामावर आधारित कामगार, बांधकाम कामगार व इतर राज्यांतून मजुरीसाठी येणार्‍या कामगारांची माहिती संकलित केली जाईल. यावर अशा मजुरांच्या नोंदणीची सुविधा असेल. त्यांना एक वर्षासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत मोफत विमा संरक्षण देण्यात येईल. कामगार ब्युरो चार नवीन सर्वेक्षण करणार असून, कामगार, घरगुती कामगार, व्यावसायिक आणि इतर राज्यांतून येणाऱ्या परिवहन क्षेत्राद्वारे मिळणार्‍या रोजगाराशी संबंधित, असेही चंद्र यांनी सांगितले. ब्यूरो आस्थापनांवर आधारित अखिल भारतीय रोजगार सर्वेक्षण सुरू करेल.

Tags: marathi newsNew Labour Act
Previous Post

अकोला जिल्हयातील ११६ सरपंच, उपसरपंचपदांची आज निवडणूक !

Next Post

चोहोट्टा बाजार येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा स्वयंम सहाय्यता महिला समूहाना कर्ज वाटप मेळावा संपन्न

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
चोहोट्टा बाजार येथे  विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा  स्वयंम सहाय्यता महिला समूहाना कर्ज वाटप मेळावा संपन्न

चोहोट्टा बाजार येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा स्वयंम सहाय्यता महिला समूहाना कर्ज वाटप मेळावा संपन्न

विधान परिषदेत गाजला हिवरखेड नगरपंचायतचा मुद्दा,आ. मिटकरींनी उचलले अकोला जिल्ह्यातील अनेक विषय

हिवरखेड सरपंचपद अनुसूचित प्रवर्गासाठी आरक्षित करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.