तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा आगारातुन जळगाव जामोद साठी दिवसभरातुन एकही बस सुरू नसल्याने तेल्हारा आगारातील एकंदरीत कामकाजावर प्रश्न चिन्ह उभे राहत आहेशिवाय प्रवाशी व शालेय विद्यार्थ्यांची बस नसल्याने मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे
तेल्हारा तालुक्यातुन दररोज प्रवाशी व्यापारी तसेच विविध शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच आय टि आय चे विद्यार्थी तसेच विद्यालय महाविद्यालयचे विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो परंतु तेल्हारा आगारातुन जळगाव व संग्रामपूर साठी एकही बस सोडण्यात येत नाही याबाबत प्रवाशी व विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापक यांच्या बस सेवा सुरु करण्याबाबत विनंती केली असली तरी याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे
तेल्हारा हे तालुक्याचे ठिकाण आहे शिवाय याठिकाणी विविध शासकीय निमशासकीय कार्यालये आहेत विशेष म्हणजे याठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महमंडळाचे टोलेजंग असे कार्यालय असतात देखील याठिकाणाहुन जळगाव जामोद साठी बस नसल्याने तेल्हारा आगाराच्या एकंदरित कारभारामुळे प्रवाशी ,विद्यार्थी , विविध शासकीय व निमशासकीय अधिकारी यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली जात
जळगाव जामोद रोडचे काम सुरू असून रस्ता अतिशय खराब आहे त्यामुळे लाब पल्ल्याची जळगाव जामोद बसही बंद आहे तेल्हारा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी माळेगांव दानापुर पर्यंत बसेस सुरू आहेत काकनवाडा जवळ रस्त्याच्या आजुबाजुला मोठे गिट्टीचे गंज असल्याने बस बंद करण्यात आली असे असले तरी बस सुरू व्हावी डेनिग बस पाठवुन सव्हे करण्यात आला त्याचा अहवाल आल्यानंतर बस सुरू करण्याबाबत प्रयत्न केला जाणार असल्याचे आगार व्यवस्थापक वानरे यांनी सांगितले
——————————————————-
तेल्हारा जळगाव बस सेवा बंद असल्यामुळे खाजगी वाहनधारकांनकडून वीद्यार्थाची आर्थिक लूट होत आहे तरी वीद्यार्थाची अड़चन लक्षात घेउन बस सेवा सुरळीत सूरु करावी
शुभम सोनटक्के
विद्यार्थी औद्योगिक प्रशिक्षण संस्था संग्रामपुर