अमरावती(प्रतिनिधी)– जगतगुरु भगवान श्री श्री 1008 स्वामी रामानंदचार्य जन्मोत्सव रथयात्रा महोत्सव व महाप्रसाद सोहळा श्री रुक्मिणी पिठ चे पिठाधीश जगतगुरु स्वामी रामराजेश्वराचार्य यांच्या प्रमुख उपस्थिती भव्य स्वरूपात अमरावती येथे संपन्न झाला.
महाराष्ट्र प्रथमच पिठाधीश यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य स्वरुपात भगवान रामानंदचार्य महोत्सवा चे*आयोजन वैष्णव बैरागी बहुउद्येशिय संघटनेच्या वतिने करण्यात आले होते स्वामी रामराजेश्वराचार्य संकटमोचन मंदीराचे महंत मदन मोहन महाराज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नारायणदास वैष्णव नांदगाव खन्डेश्वर संस्थापक उपाध्यक्ष प्रविणदास वैष्णव व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते भगवान जगतगुरु रामानंदचार्य जी यांच्या प्रतीममेचे पुजन दीपप्रज्वलन महाआरती करण्यात आले श्री कैडण्यपुर चे पिठाधीश स्वामी रामराजेश्वराचार्य यांनी आपल्या संबोघनातुन जगतगुरु रामानंदचार्य याचे जिवनकार्यत केलेले कार्य अती महत्त्वचे होते यानंतर संघटनेचे अध्यक्ष नारायण दास वैष्णव नांदगाव खन्डेश्वर उपाध्यक्ष प्रविणदास वैष्णव तेल्हारासचिव दीपकदास वैष्णव अकोला यांनी आपले मत व्यक्त केले या वेळी महाराष्ट्रातिल विविध जिल्हातुन समाज बांधव व भक्तगन उपस्थित होते कार्यक्रम चे सुत्रसंचालन अमरावती विभागीय अध्यक्ष खुशाल वैष्णव यांनी केले