अकोला(दीपक गवई)– संयुक्त किसान मोर्चानं सहा फेब्रुवारीला आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे.त्या अनुषंगाने किसान विकास मंच अकोलाच्या वतीने होणाऱ्या आंदोलनास वंचित बहूजन आघाडी भारिप बहूजन महासंघ अकोला जिल्हयाच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला असल्याने वंचीत चे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे ह्यांनी जाहीर केले आहे.
देशीतील काळे शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत ह्या मागणीसाठी गेली ७० दिवस शेतकरी लढत आहेत.शेतकरी नेत्यांनी ६ फेब्रुवारीला राष्ट्रव्यापी आंदोलन जाहीर केलं आहे. त्याचा एक भाग म्हणून किसान विकास मंच अकोलाच्या वतीने उद्या आंदोलन जाहीर केले आहे.ह्या आंदोलनास पक्षाच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, भारिप जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे, ह्यांनी जाहीर केले आहे.