अकोला(प्रतिनिधी)– फॅन्सी नंबर प्लेट व डुप्लिकेट सायलेन्सर बदलून देणाऱ्यांना लेखी नोटीस ,शहर वाहतूक शाखे कडून मागील 2 महिन्या पासून बुलेट ह्या दुचाकी चे मुळ सायलेन्सर मध्ये बदल करून डुप्लिकेट फटाके फोडणारे व मोठा आवाज करणारे सायलेन्सर लावून भरधाव वेगाने बुलेट चालविणाऱ्या बुलेट राजा विरुद्ध कारवाईचा बडगा शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी उगारून धडक मोहीम सुरू केली होती, ह्या मोहिमे अंतर्गत आता पर्यंत अश्या 50 बुलेट वाहतूक कार्यालयात लावून सदर बुलेट ला लावलेले डुप्लिकेट सायलेन्सर जे इंदोरी, पंजाबी, डबल पंजाबी अश्या नावाने ओळखल्या जातात असे सायलेन्सर काढून मुळ सायलेन्सर लावून दंडात्मक कारवाई करूनच सदर बुलेट सोडण्यात आल्या, सदर मोहिमे दरम्यान वाहतूक शाखेला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला, परंतु शहर वाहतूक शाखेने कोणताही मुलाहिजा न ठेवता ही मोहीम राबवून जवळपास 50 बुलेट वर दंडात्मक व पुढील कारवाई केली, ह्या मोहिमेच्या धसक्याने बऱ्याच बुलेट राजांनी आपल्या दुचाकींचे डुप्लिकेट सायलेन्सर बदलून ओरिजिनल सायलेन्सर लावले, त्याच प्रमाणे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी आज दिनांक 5।2।21 रोजी अकोला शहरातील फॅन्सी नंबर प्लेट बनविणारे, डुप्लिकेट सायलेन्सर लावून देणाऱ्या कारागिरांची वाहतूक कार्यालयात मीटिंग घेऊन कोणत्याही परिस्थिती मध्ये फॅन्सी नंबर प्लेट व डुप्लिकेट सायलेन्सर बदलून देता कामा नये अशी तंबी देऊन त्यांना लेखी नोटीस सुद्धा देण्यात आली, डुप्लिकेट सायलेन्सर लावून फटाके फोडत बुलेट चालविणाऱ्या ह्या बुलेट राजांना चाप लावण्यासाठी ही मोहीम पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे मार्गदर्शनात सुरूच राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सांगितले।