अकोला (डॉ चांद शेख)- दिनांक २ फेबुवारी २०२१ रोजी पातूर रोड वरील प्रभात किड्स अकोला येथे जिल्हा विधी सेवा प्राधीकरण अकोला च्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न झाला असून या कार्यकमाला प्रमुक पाहुणे म्हणून स्वरूप बोस , सचिव ,जिल्हा विधी सेवा प्राधीकरण अकोला, विनोद जी जिचकार, उपप्रादेशीक परिवाहण अधिकारी, डॉ . गजानन नारे, अध्यक्ष प्रभात किड्स अकोला , यांनी रस्ता सुरक्षा संदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमला यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधीकरनाचे अधिक्षक सुनिल पाटील सर, वरिष्ठ लिपीक श्रीहरी टाकळीकर, कनिष्ठ लिपीक राजेश देशमुख, कुणाल पांडे, शिपाई मों . शरीफ , शाहबाज खान, तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, वहानाचे ड्रायव्हर, कंडाक्टर, इतर नागरीक उपस्थीत होते .