तेल्हारा( प्रतिनिधी):- गेल्या वर्षभरापासून घरात शिरत असलेल्या सांडपान्या बाबत वारंवार सांगून निवेदन देऊन तेल्हारा नगरपालिकेच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे जिजामाता नगरातील नागरिक अनिल रामराव थेटे हे ५ फेब्रुवारीला नगरपालिकेच्या कार्यालयात सहकुटुंब वास्तव्यास येणार असल्या बाबतचे माहिती लेखी निवेदनाद्वारे पालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व ठाणेदार पोलीस स्टेशन तेल्हारा यांना दिली आहे
काही महिन्यांअगोदर अनिल थेटे यांनी नगर परिषद कार्यालय येथे रीतसर निवेदन सादर केले होते यामध्ये माझ्या घरासमोरील नालीतील सांडपाणी माझ्या घरात शिरत असल्याबाबत तक्रार केली होती पण त्यावर कुठलीही अंबलबजावणी करण्यात आली नाही . मला उडवा उडवी चे उत्तरे देऊन नाहक मानसिक त्रास आपल्या कार्यालय द्वारे दिला जात आहे . सदर सांडपाणी माझ्या घरात शिरल्याने माझे व माझ्या कुटूंबियांचे आरोग्य धोक्यात आहे . त्याच बरोबर मी अनेक रोंगानी ग्रस्त असून या दुर्गंधी व सांडपाणी अस्वछ्ते मुळे माझ्या जीवितास धोका निर्माण झाला आहे
तसेच सांडपाणी घरात शिरत असल्यामुळे घराघरांमध्ये दुर्गंधी निर्माण झाली आहे या पाण्यासंदर्भात नगरपालिकेला यापूर्वी मुख्याधिकारी अध्यक्ष नगरसेवकांना निवेदन देण्यात आले होते त्यावेळी एक महिन्याच्या आत नालीचे बांधकाम पूर्ण करू असे आश्वासन नगरपालिकाने दिले होते परंतु आजपर्यंत नालीचे बांधकाम झाले नाही त्यामुळे सांडपाणी हे माझ्या घरांमध्ये शिरत आहे तसेच रस्त्यावर सुद्धा आले आहे या सांडपाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी निर्माण झाली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या सांडपाण्यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शेवटी माझे आरोग्य धोक्यात येऊ नये याकरिता मी व माझे कुटूंब आपल्या नगर परिषद कार्यालय मध्ये नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्या दालनात माझ्या कुटूंबासह दि. ०५/०२/२०२१ पासून वास्तव्यास राहण्यास येत आहे यापलीकडे माझ्या कडे कुठलाही पर्याय उरलेला नाही असे निवेदन अनिल थेटे यांनी तेल्हारा पालिकेचे अध्यक्ष ,मुख्याधिकारी व थानेदार पोलिस स्टेशन तेल्हारा यांना दिले आहे नगर पालिका आता यावर काय निर्णय घेते या कड़े संपूर्ण नागरिकांचे लक्ष लागलेले आहे