अकोट(शिवा मगर)– गावं म्हटले। की चांगले आणि वाईट गुण असणाऱ्या लोकांचा समूह असतो या दोन्ही समूहाला चालविण्यासाठी सरपंच हा प्रमुख असल्याने कठोर पिता असतो आणि मायाळू माता असतो तर प्रत्येकाच्या विकासासाठी आणि गावातील बहिणीच्या रक्षणासाठी गावचा भाऊ असतो म्हणूनच सरपंचांमध्ये चांगले आणि वाईट गुण असणे आवश्यक असल्याचे मत मराठवाड्यातील पाटोदा गावांचे 25 वर्षे सरपंच राहिलेले तथा तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुरस्कृत झालेले पेरे पाटील यांनी अकोट तालुक्यातील वरुर जऊळका येथे नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना मांडले.
पेरे पाटील यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले की गावचा विकास सरपंचाच्या हाती असतो त्यासाठी कोणत्याही प्रकारची शासकीय योजनांची वाट पाहण्याची गरज नाही केवळ गावात असलेल्या नागरिकांना त्यांना आवश्यक सोइ सुविधा उपलब्ध करून दिल्या तर गावचे नागरिक स्वतः हुन कर भरणा करतात आणि त्यातूनच गावं विकास साध्य होऊन निधी शिल्लक उरतो गरज असते फक्त नियोजनाची याच माध्यमातून त्यांनी त्यांच्या गावात गावतील नागरिकांना सकाळी अंघोळीसाठी गरम पाणी त्यानंतर पिण्यासाठी आणि वापरासाठी असे चार प्रकारचे पाणी ग्रामपंचायत पुरवत आहे तर पिठाची गिरणी मोफत अविरत चालू असते तसेच शेतकरी वर्गासाठी ग्रामपंचायत अर्ध्या भाड्यावर ट्रॅकटर देते तसेच इतरहि कामे याच पद्धतीने केले जाते त्यामुळे शासकीय जी आर ची वाट न पाहता गावाच्या लोकांच्या सहकार्याने विकासकामे करा असे आवाहन केले.
याच कार्यक्रमात सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांनी आपले मत व्यक्त केले तर माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनीही आपले विचार मांडलेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह भ प गणेश महाराज शेटे यांनी केले तर यावेळी व्यासपीठावरआदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील पाटोदा,समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज,माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे,जिल्हा परिषद सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी , पंचायत समिती सभापती ललिताताई नितोने , प्रदीप वानखडे, रामभाऊ गव्हानकर, पोलीस निरीक्षक महल्ले आकोट शहर , कपिलदादा ढोके, सचिन शिराळे, पिंटूभाऊ शिवरकर, डॉ अढाऊ, राजुभाऊ नागमते ,किशोरभाऊ बुले, धीरज भाऊ शिरसाट, अमांकर साहेब , माधवराव बकाल, रमेश भाऊ खिरकर, कुलदीप पाटील वसु ,निखिल भाऊ गावंडे, शरदचंद्र जैस्वाल, पंजाबराव वानखेडे,गोवर्धन आवारे,ग्रामसेवक वायळ ,तलाठी अवारे ताई ,राजेश सावरकर तंटामुक्ती अध्यक्ष जऊळका,प्रकाशभाऊ डोयफोळे, तंटामुक्ती अध्यक्ष वरुर,अरुण सोंन्टक्के जि प शाळा अध्यक्ष, शेषराव घनबहादूर जि प शाळा अध्यक्ष वरुर, संदिपपाल महाराज,रामपाल महाराज, एकनाथ म पवार ,श्रीधर महाराज पातोंड,बाळु महाराज कुलट,ऊध्धव महाराज कुलट,प्रकाश म पांडे,प्रविन म कुलट, गोपाल म नारे, निखिल म गोबरे,नंदु म शिंन्दे यांची उपस्थिती होती . सूत्रसंचलन वैभव नायसे यांनी केले या कार्यक्रमासाठी पंचकृषितील वरुर,जऊळका,विटाळी, कुटासा, कावसा, तरोडा ,रोहनखेड, बांबर्डा, पुंढा, लोतखेड, सावरगाव ,खापरवाडी खु खापरवाडी बु कालवाडी, देवरी,पळसोद,आलेवाडी, बळेगाव तांदुळवाडी, पिंपळोद, कवठा या गावातील नवनिर्वाचित व विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला