नागपूर: फेसबुकवर मैत्री होते, अनेकजण फेसबुकवर आपले मित्र शोधतात. आजकाल सर्वं स्मार्टफोन वापरकर्त्यांची, फेसबुकवर अकाउंट असतेच. अनेकजण विरंगुळा म्हणून या साईट्सचा वापर करतात. अनेक तरुण तरुणींचे संबंध जुळवण्यातही फेसबुकचा मोठा वाटा आहे. पण या फेसबुकमुळे अनेक अर्थिक फसवणुकीचे प्रसंगही घडतात. असा एक प्रसंग नागपूरमध्ये उघडकीस आला आहे.
नागपूर येथील असेच एक पेन्शनर आजोबा टाईमपास करायला फेसबुकवर यायचे, बघताबघता आजोबा फेसबुकवर छान रमले. त्यातून त्यांची एक मैत्रीण झाली. इथली तिथली नाही थेट लंडनमधली. तीच नाव लिंडा थॉमसन.या लिंडाबरोबर आजोबा फोनवर बोलू लागले. एकमेकांना छानछान फोटो पाठवू लागले. या फोटोंच्या देवाणघेवाणीतून त्या दोघांची मैत्री घट्ट होत गेली.
त्यादरम्यान कोरोना आला या कोरोना काळात ऑक्टोबर महिन्यात आजोबांची फ्रेंड लिंडा थॉमसनने अचानक आजोबांना फोन केला. आणि सांगितलं कि मी दिल्लीत आली आहे, करोना काळात मला भारतात समाजसेवा करायची आहे, मला माहित नव्हतं की, सोबत कोट्यवधी रुपये घेऊन प्रवास करायचा नसतो. आता कस्टममधील अधिकाऱ्यांनी पकडलं आहे, माझी इथून सुटका करण्यासाठी त्यांना १० लाख देणे गरजेचे आहे, माझी सुटका झाल्यावर तुम्हाला तुमचे १० लाख परत करेन.
हे पटावं म्हणून लिंडाने आजोबांचे बोलणे खोट्या अधिकाऱ्यांशी करून दिले. अधिका-याशी बोलल्याने आजोबांची खात्री झाली कि, लिंडा अडचणीत आहे तिला बाहेर काढणे गरजेचे आहे अशी समजूत करून घेऊन लगेचच आजोबांनी आपल्याजवळ निवृत्तीवेतनातील म्हातारपणाची पुंजी १० लाखाच्या आसपास होती, ती आजोबानी कसलाही मागचा पुढचा विचार न करता विश्वासाने ट्रान्सफर केली.
बरेच दिवस गेल्यानंतर लिंडा थॉम्सनचा पत्ताच नाही, तसेच कोणताही मेसेज नाही, घेतलेली रक्कम परत केली नाही, शेवटी बऱ्याच दिवसानी लिंडाची वाट पाहून आजोबानी नागपूर येथील बजाजनगर पोलिस स्थानकात फसवणुकीची तक्रार केली, पोलिलीस पुढचा शोध घेत आहेत.