तेल्हारा(प्रतिनिधी)- दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलना मध्ये महाराष्ट्र किसान महासभेचे नेते अरुण बनकर यांनी देशाचे पंतप्रधान व रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत याना बॉम्बने उडवून टाकण्याची भाषा वापरणाऱ्या अरुण बनकर यांच्या विरोधात आज भाजयुमो चे प्रदेश अध्यक्ष विक्रांतजी पाटील यांच्या सुचने नुसार व भाजपचे जिल्हाध्यक्ष आ.रणधीरजी सावरकर,अकोट विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाशजी भारसाकळे,भाजयुमो चे प्रदेश सचिव व अकोला जिल्हा प्रभारी सोपानजी कनेरकर यांच्या मार्गदर्शनात व अकोला जिल्हा भाजयुमो अध्यक्ष सचिनबाप्पू देशमुख,तेल्हारा शहर भाजयुमो अध्यक्ष गणेश इंगोले यांच्या नेतृत्वात स्थानिक अकोट पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
यावेळी भाजप शहर अध्यक्ष महेंद्र गोयनका,भाजपा सरचिटणीस गजानन गायकवाड,नगर सेवक सुनील राठोड,मंगेश ठाकरे,भाजयुमो तेल्हारा शहर अध्यक्ष गणेश इंगोले,भाजप ओबीसी आघाडी शहर अध्यक्ष राहुल झापर्डे,भाजयुमो उपाध्यक्ष ऋषभ ठाकूर,पंकज देशमुख,छोटू विखे,अभय काळे,भरत जोशी,राजा कुरेशी,शुभम पारदे,व भाजप व भाजयुमो चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.