• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दिल्लीतील इस्रायल दूतावासाजवळ स्फोट; गुप्तचर विभाग, स्पेशल सेलकडून तपास सुरू

Team by Team
January 30, 2021
in Featured, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
79 0
0
दिल्लीतील इस्रायल दूतावासाजवळ स्फोट; गुप्तचर विभाग, स्पेशल सेलकडून तपास सुरू
63
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली: दिल्लीच्या अब्दुल कलाम मार्गावर शुक्रवारी संध्याकाळी स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात परिसरातील चार ते पाच गाड्यांचे नुकसान झाले आहे. अद्याप कोणत्याही जीवितहानीची माहिती नाही. हा स्फोट कमी तीव्रतेचा असला तरी सध्या दिल्लीतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या घटनेला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे दिल्लीतील सर्व सुरक्षायंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, हा स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अब्दुल कलाम मार्ग हा व्हीव्हीआयपी परिसर आहे. याठिकाणी अनेक देशांचे दुतावास आहेत. इस्रायली दुतावासाबाहेर हा स्फोट झाल्याचे सांगितले जाते. सध्या पोलीस आणि सुरक्षायंत्रणा अब्दुल कलाम मार्गावर दाखल झाल्या असून तपासाला सुरुवात झाली आहे. या परिसराला सध्या पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकायला आला. या स्फोटामुळे उभ्या असलेल्या काही गाड्यांच्या काचा फुटल्या. सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही. हा परिसर VVIP असल्यामुळे इथली सुरक्षा व्यवस्था कडक असते. या स्फोटानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. कमी तीव्रतेचा हा स्फोट आहे. संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. या स्फोटात कुणालाही दुखापत झालेली नाही, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

A low-intensity explosion happened near the Israel Embassy in Delhi, nature of explosion being ascertained. Some broken glasses at spot. No injuries reported; further investigation underway pic.twitter.com/xqIllrCZOQ

— ANI (@ANI) January 29, 2021

आयईडी स्फोटकांचा वापर?
जिंदल हाऊसच्या बाहेर असलेल्या झुडुपांत आढळलेल्या एका पिशवीत असलेल्या स्फोटकांमुळे हा स्फोट झाल्याचं समजतंय. ‘आयईडी’च्या माध्यमातून हा स्फोट घडवून आणण्यात आल्याचा अंदाज आहे. सध्या बॉम्बशोधक पथक आणि इतर तपासयंत्रणांनी घटनास्थळाचा ताबा घेतला असून तपासाला सुरुवात केली आहे. स्फोट झालेल्या परिसरापासून काहीच किलोमीटर अंतरावर ‘बिटिंग द रिट्रीट’ सोहळा सुरू होता .

Tags: Bomb explosion israel embassy
Previous Post

काँग्रेस खासदार शशी थरुर आणि ६ पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

Next Post

बियाणे लागवडीसाठी 90 टक्के अनुदान

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
Farmer

बियाणे लागवडीसाठी 90 टक्के अनुदान

पंतप्रधान मोदी व सरसंघचालक भागवत यांच्याविषयी आक्षेपार्ह्य प्रतिक्रिया देणाऱ्यावर कारवाई करा-भाजयुमो ची मागणी

पंतप्रधान मोदी व सरसंघचालक भागवत यांच्याविषयी आक्षेपार्ह्य प्रतिक्रिया देणाऱ्यावर कारवाई करा-भाजयुमो ची मागणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.