Xiaomi चे दोन बजेट स्मार्टफोन Redmi 8 आणि Redmi 8A ला MIUI 12 Update मिळण्यास सुरुवात झाली आहे. MIUI 12 Update मिळाल्याने लाखो रेडमी 8आणि रेडमी 8 ए यूजर्सना फायदा होणार आहे. रेडमी 8ला मिळालेले नवीन अपडेट व्हर्जन MIUI V12.0.1.0.QCNINXM, तर रेडमी 8 ए ला मिळालेले व्हर्जन MIUI V12.0.1.0.QCPINXM आहे. (Redmi 8 and Redmi 8A have started getting MIUI 12 update in India)
Xiaomi ने लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेटच्या माध्यमातून दोन्ही Redmi Mobiles के यूजर्सना इंटरफेस-लेवलमध्ये बरेच बदल केले आहेत. अपडेट मिळाल्याने रेडमी 8 आणि रेडमी 8 ए के ऑपरेटिंग सिस्टम व्हर्जनमध्ये कोणताही बदल होणार नाही. म्हणजेच दोन्ही स्मार्टफोन Android 10 वर काम करतील. शाओमीने MIUI 12 Update ला बॅच करून रेडमी 8 आणि रेडमी 8 ए यूजर्ससाठी रोलआउट केले आहे. बऱ्याच यूजर्सनी सोशल मीडियावर लेटेस्ट अपडेट मिळाल्याचे सांगितले आहे. ही अपडेट भारतीय यूजर्ससाठी आहे.
काय बदल होणार?
रेडमी स्मार्टफोन्सना जानेवारी 2021 अॅड्राँईड सिक्योरिटी पॅच करण्यात आले आहे. अपडेट नव्या ॲनिमेशन इफेक्ट्समध्ये येत आहे. MIUI 12 अपडेट Redmi 8 आणि Redmi 8A स्मार्टफोनमध्ये डार्क मोड ऑप्टिमाईज करतो. तसेच लँडस्केप व्ह्यू मध्ये कंट्रोल सेंटर लेआउटमध्ये सुधारणा झाली आहे. आपल्याला स्टेटस बार आणि नोटिफिकेशन शेडमध्ये सुधारणा झालेली दिसून येईल.
रेडमी 8 ला मिळालेली अपडेट फाईल साईज 2.1 जीबी, तर रेडमी 8 ए स्मार्टफोनला मिळालेली अपडेट साईज 1.8 जीबी आहे. विशेष बाब म्हणजे ही अपडेट अॅड्राँईड 10 ओएसवर आधारित आहे. जर आपण रेडमी 8 किंवा रेडमी 8 ए स्मार्टफोनचा वापर करत असाल, तर आपल्याला सॉफ्टवेअर अपडेट नोटिफिकेशन मिळेल.