पुढारी : सध्या स्पर्धेच्या युगात सर्वात जास्त स्पर्धा पाहायला मिळत आहे ती दूरसंचार क्षेत्रामध्ये. काही वर्षांपूर्वी एअरटेल (airtel), आयडिया(idea) आणि व्होडाफोन (vodafone) यांचा दबदबा असलेल हे क्षेत्र अगदी कमी वेळात अंबानींच्या जिओने (Jio) काबीज केलं, आणि खऱ्या अर्थाने दूरसंचार क्षेत्र ग्राहकांसाठी सोनेरी प्लॅन्सच भलंमोठं घबाड घेऊन खुले झाले.
या क्षेत्रात टिकण्यासाठी कंपन्यांनी विविध किफायतशीर प्लॅन्सद्वारे(Plans) ग्राहकांना आकर्षित करण्याचा फंडा चालवला आहे. कंपन्या रोजच ग्राहकांसाठी नवनवीन प्लॅन्स घेऊन येत आहेत. आता असाच एक कमी किमतीमधील प्लॅन ग्राहकांसाठी आणला आहे. तो ही चक्क १६ रुपयांत ४G इंटरनेटचा. चला तर मग जाणून घेऊया या प्लॅनसोबत इतरही अनेक प्लॅन्स जे तुमच्या खिशाला परवडती आणि सोबत फायद्याचे ठरतील. (affordable 4G data plans of airtel these companies)
एअरटेल डेटा प्लॅन्स
एअरटेलने नुकताच ॲड ऑन प्लॅन्सची यादीच वाढवली आहे. एअरटेल थँक्स अँपद्वारे आता ७८ रु, ८९रु, १३१रु आणि २४८ रुपयांचे इंटरनेट प्लॅन उपलब्ध आहेत. यासोबतच एअरटेल ४८रु,९८ रु, २५१रु आणि ४०१ रुपयांचे प्लॅन्सही अगोदरपासूनच उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हे ॲड ऑन प्लॅन्स रेग्युलर प्लॅनसोबत आपण वापरू शकतो. ४८ रु आणि ४०१ रुपयांचे २८ दिवसांची वैधता असणारे प्लॅन्स एअरटेलकडून एक्सक्लुझिव्ह असून ते फक्त एअरटेल थँक्स अँपमधून रिचार्ज करून आपण वापरू शकतो. ४८ रुपयांच्या प्लॅन मध्ये ३ जीबी इतका डेटा ग्राहकांना मिळतो. ज्याची २८ दिवस वैधता आहे. ९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये १२ जीबी डेटा मिळतो तर २५१ रुपयांच्या प्लॅनमध्ये ५० जीबी डेटा मिळत असून, या दोन्ही प्लॅन्सची वैधता चालू प्लॅन्सच्या वैधतेनुसार लागू राहते.
VI डेटा प्लॅन्स-
व्होडाफोन आणि आयडिया यांचे एकत्रीकरण झाल्यानंतर VI या नव्या कंपनीने ग्राहकांसाठी कमी वेळात वेगवेगळे प्लॅन्स आणले आहेत. नुकताच त्यांनी आतापर्यंतचा सर्वात कमी किमतीचा प्लॅन बाजारात आणला आहे. १६ रुपयांच्या या प्लॅनमध्ये आपणास १ जीबी डेटा २४ तासांच्या वैधतेसह मिळत आहे. ४८ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३ जीबी डेटा मिळत असून त्याची वैधता २८ दिवसांची आहे. तर ९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये १२ जीबी डेटा २८ दिवसांच्या वैधतेसह मिळतो. तर ३५५ रुपयांच्या डेटा प्लॅनमध्ये ५० जीबी डेटा २८ दिवसांच्या वैधतेसह मिळतो. सध्या VI चे हे सर्व प्लॅन ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत.
जिओ डेटा प्लॅन-
जिओचा विचार केला तर आजपर्यंत जिओने आपल्या जबरी प्लॅन्सने ग्राहकांची नेहमीच मने जिंकली आहेत. सध्या कंपनीचे ५१ रु, १०१ रु, ४९९ रुपयांचे डेटा प्लॅन्स उपलब्ध आहेत. कंपनीतर्फे काही टॉकटाइम प्लॅन्सवर सुद्धा अतिरिक्त डेटा मिळत होता पण IUC(Interconnect Usage Charge) चार्ज हटविल्यामुळे कंपनीकडून अतिरिक्त डेटा आता देणे बंद झाले आहे. सध्या कंपनीकडून ५१ रुपयांच्या प्लॅनमध्ये ६५६ IUC मिनिटे आणि ६जीबी अतिरिक्त डेटा दिला जातो. १०१ रुपयांच्या प्लॅनमध्ये १३६२ IUC मिनिट आणि १२ जीबी अतिरिक्त डेटा दिला जातो.
सर्वात प्रसिद्ध ठरलेला जिओचा प्लॅन आहे तो ४९९ रुपयांचा. या ५६ दिवसांची वैधता असणाऱ्या या प्लॅनमध्ये ग्राहकास रोज १.५ जीबी डेटा मिळतो. सोबत १ वर्षांचे Disney आणि हॉटस्टारचे सब्स्क्रिप्शन सुद्धा मिळते.मात्र या प्लॅनमध्ये कोणत्याच प्रकारचाही कॉलिंग आणि एसएमएस सुविधा ग्राहकास मिळत नाही. एकूणच नवीन वर्षात कंपन्यांच्या वाढत्या स्पर्धेमुळे ग्राहकांची मात्र चांदी होणार आहे, असेच चित्र सध्याच्या या नव्या प्लॅन्सवरून दिसते.