अकोला(प्रतिनिधी)– अकोला जिल्ह्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उदभवली की जीव वाचविण्यासाठी व मदत करण्यासाठी धावून येणाऱ्या व पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून निस्वार्थ भावनेने मदत करणाऱ्या अश्या देवदूतांचा पुष्पगुच्छ देऊन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सत्कार करून त्यांची पाट थोपटली.
रास्ता सुरक्षा अभियानाचे पार्श्वभूमीवर एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत किंवा रास्ता अपघात झाल्यास त्वरित धाव घेऊन पोलिसांची वाट न पाहता मदत करणाऱ्या व्यक्तींचा रिधोरा बायपास जवळ एका छोटेखानी कार्यक्रमात शहर वाहतूक शाखा अकोला तर्फे सत्कार करण्यात आला, ह्या मध्ये फक्त अकोल्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सध्या आपल्या कार्याने नावलौकिक मिळविलेले पिंजर येथील संत गाडगेबाबा शोध व मदत पथक तसेच रिधोरा येथील अपघात मदत पथक ह्यांचा समावेश होता, संत गाडगेबाबा शोध व मदत पथकाचे संचालक दीपक सदाफळे तसेच त्यांचे पथकातील अंकुश सदाफळे,गोकुल तायडे, संकेत देशमुख,ऋषिकेश तायडे, गोविंदा ढोके, मयूर सलेदार, ऋषिकेश राखोंडे, ह्यांचा तसेच अपघात मदत पथक रिधोरा चे संचालक पोलीस पाटील सुजय देशमुख, तलाठी प्रशांत बुले, तंटा मुक्ती अध्यक्ष मधुकर देशमुख, संजय अघडते ग्राम पंचायत सदस्य, नितीन देशमुख, अनिल दंदी माजी सरपंच,अमोल लाव्हाले, गजानन शेजाळे, प्रमोद शेंडे, शंकर मुंडे, यशवंत देशमुख ह्यांचा पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला ह्या प्रसंगी संत गाडगेबाबा शोध व बचत पथकाचे संचालक दीपक सदाफळे ह्यांनी वेळोवेळी त्यांनी राबविलेल्या चित्तथरारक अश्या रेस्क्यू ऑपरेशन चे अनुभव सांगितले तसेच रिधोरा अपघात बचाव पथकाचे प्रशांत बुले व सुजय देशमुख ह्यांनी अपघात ग्रस्तांना मदत करतांना आलेले अनुभव कथन केले त्या वेळी उपस्थितांचा श्वास रोखल्या गेला होता। सर्वांनी त्यांच्या सत्कारा बद्दल शहर वाहतूक शाखेचे आभार व्यक्त केले, सत्कार कार्यक्रमाला स्थानिक पत्रकार अनिल दंदी व शिवदास जामोदे व रिधोरा ग्रामस्थ उपस्थित होते