तेल्हारा :- आगामी होऊ घातलेल्या तेलारा नगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणुकीकरिता चार वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या तेल्हारा विकास मंच की बैठक नुकतीच पार पडली असून तेलारा नगरपालिकेची निवडणूक तेल्हारा विकास मंच या माध्यमातून लढविल्या जाणार असून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये कुशल संघटक सामाजिक कार्यकर्ते मोहन श्रीवास यांची संभाव्य वार्ड करिता उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
चार वर्षांपूर्वी तेल्हारा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक झाली होती त्यावेळी विकास मंचची स्थापना करून त्या माध्यमातून निवडणूक लढविल्या जाणार असल्याचे जाहिर करण्यात साले होते परंतु वेळेवर नियोजन होऊ शकले नाही परंतु या वेळेस नियोजनबद्ध कार्यक्रम आखुन मंच निवडणूक लढवीनार असून त्याकरिता आयोजित बैठकीमध्ये सामाजिक कार्यकर्ते मोहन श्रीवास यांची संभाव्य वार्ड मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे शहराचा सर्वांगीण विकास व्हावा समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा शासनाच्या योजनांची माहिती सर्वांना मिळावी व त्याचा लाभ विनाविलंब लाभार्थींना मिळावा सामाजिक समरसता निर्माण व्हावी ,लोकशाही कायद्याने व शासनाने यशस्वी होऊ शकत नाही त्यासाठी लोकांचे मत परिवर्तन व मानसिक सुधारणा करण्याचे प्रयत्न विकास मंचच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे मत विकास मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर यांनी व्यक्त करून पुढील दिशा ठरविन्यात आली यावेळी बैठकीला राहुल देशमुख , बजरंग गव्हाणे, प्रमोद सोनटक्के ,सुनील उबाळे, विठ्ठल ठाकरे, राजेश देशमुख, अर्जुन खारोडे , सुनील गर्जे, स्वप्निल सुरे , उमेश उज्जैनकर , बाबू टेलर , मंगेश उबाळे, लखन सोनटक्के , निखिल देशमुख, गोपाल श्रीवास , बंटी गायकवाड, अंकुश खळसान, विक्रम खारोडे , गिरधारी श्रीवास , योगेश मस्तूद, गणेश भटकर , अजय खोले , गणेश भुजबले , राज खारोडे , सुरेश तायड़े इत्यादि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
एक हजार कार्यकर्त्यांची फळी तयार करून पालिकेत बदल करण्याचा प्रयत्न करू -फाटकर
आगामी होऊ घातलेल्या तेल्हारा नगर परिषद च्या सार्वत्रिक निवडणुकी साठी समाजातील प्रत्येक घटका सह अठरा पगळ जाती व बारा बलुतेदाराना सोबत घेऊन * तेल्हारा विकास मंच निवडनुकीच्या रणांगणात उतरून निवडणूक लढनार असून तेलारा पालिकेत बदल घडविण्याकरिता एक हजार युवकांची फ़ळी तयार करून त्यांच्या सहकार्याने नियोजनबद्ध कार्यक्रम आखून पालिकेतील १७ जागांपैकी जास्तीत जास्त जागा लढवू निवडणुकीकरिता कार्यकर्त्याना व उमेदवारांना वेळ मिळावा म्हणून पूर्व तयारी करून कामाला लागलो
रामभाऊ फाटकर,अध्यक्ष
तेल्हारा विकास मंच