अकोला(प्रतिनिधी)- कोरोनाच्या प्रादुर्भावामूळ जवळपास नऊ महिन्यापासून महाविलाय बंद आहेत, आणि आता जिल्ह्यातील शाळा सुद्धा चालू झालेल्या आहेत. तरी देखील आता पर्यंत महाविद्यालय चालू करण्या बद्दल कुठलाही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अजूनही ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण चालू आहे,परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये 70% विद्यार्थी ग्रामिंभागातील असून त्यांना ऑनलाईन शिक्षणामध्ये असंख्य तांत्रिक अडचणी उद्भवत असताना आता उन्हाळी परीक्षा मार्च महिन्यामध्ये घेण्याचा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावं लागतं आहे, जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय, ITI महाविद्यालय चालू झाले असतांना, ज्या लहान वयातील मुलांना कोरोनाचा सर्वात जास्त धोका आहे त्या बाल्यावस्थेतील मुलांच्या शाळा सुद्धा चालू झालेल्या आहेत,परंतु अजूनही महाविद्यालय अजूनही चालू झालेले नाहीत म्हणून श्री शिवाजी महाविलयामधून सौरभ वाघोडे आणि निहाल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन आपल्या समस्या सांगितल्या.
या करिता संकेत भालेराव, शुभम पौळ, अभिनव वाघाडे,ऋषीराज बंदरे, किशोर गावंडे, सौरभ पांडव, तन्वीर सिंग, निखिल सोनोने,गोपाल पाथरकर,अभिषेक हिस्सर,शुभम लाटे, वेदांत शेजोळे, घनश्याम चांदूरकर, आकाश भगत, सौरभ नेवारे, युवराज निनोरे, प्रथमेश देशमुख, प्रतिक राऊत, सुरज थोरात, ऋषिकेश घुगे, मुद्देशीर कुरेशी, स्वराज गंनगणे,साद नुमान, सय्यद नबील, शेख दानिश,तुषार चौव्हन, शहजाद परवेझ, मोहम्मद अतिफ, शंतनू ताथोड, आनंद देशमुख,उमेश हांडे, विकास उज्जेनकर, जय पांडव,यश बनाईतकर इतर सर्व विद्यार्थ्यांनी श्री शिवाजी महाविलायाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे व उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे यांना निवेदन दिले.