अकोला : अकोट येथील बहुचर्चित तुषार पुंडकर हत्याकांडप्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
२१ फेब्रुवारी २०२० रोजी अकोट येथे प्रहारचे जिल्हाप्रमुख तुषार पुंडकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी प्रहार कार्यकर्त्यांकडून उज्वल निकम यांनी युक्तिवाद करावा अशी मागणी रेटून धरली होती. यासंदर्भात राज्यमंत्री बच्चु कडु यांना सुद्धा निवेदन देण्यात आले होते. या मागणीला आता यश आले असुन तुषार पुंडकर हत्याकांडप्रकरणी काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.