अकोला – राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी पुणे येथील सिरम इन्स्टीट्युट येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले अभियंता महेंद्र प्रकाश इंगळे यांच्या चांदूर येथील निवासस्थानी सोमवारी (दि.२५)सांत्वनपर भेट दिली.
पुण्यातील सिरम इन्स्टिट्युट मध्ये लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेले अभियंता महेंद्र इंगळे हे चांदूर येथील रहिवासी होते. ना. कडू यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व कुटुंबियांचे म्हणणे ऐकून घेतले. या दुर्घटनेची कारणे जाणून दोषींवर जबाबदारी निश्चित करण्यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करु असे ना. कडू यांनी यावेळी त्यांना सांगितले.