• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

महा कृषीऊर्जा अभियान कृषी पंप वीज जोडणी धोरणाचा लाभ घेण्यात जिल्हा अग्रेसर राहील- ना. कडू

Team by Team
January 28, 2021
in अकोला, Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 0
0
महा कृषीऊर्जा अभियान कृषी पंप वीज जोडणी धोरणाचा लाभ घेण्यात जिल्हा अग्रेसर राहील- ना. कडू
12
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – महाराष्ट्र शासन ‘कृषी पंप वीज जोडणी धोरण- २०२०’अंतर्गत नविन कृषी पंप वीज जोडणी व वसूल झालेल्या वीजबिलापैकी ६६ टक्क्याचा लाभ जिल्ह्याच्या वीज विकासासाठी करून घेण्यात अकोला जिल्हा अग्रेसर राहील,असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.

विद्युत भवन अकोला येथे आयोजित महा कृषी ऊर्जा अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला महावितरण अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये,अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्यासह शेतकरी बांधव व कर्मचारीवृंद उपस्थित होते. यावेळी या अभियानाअंतर्गत पालकमंत्र्यांच्या हस्ते पाच लाभार्थ्यांना सौर कृषी पंप योजनेचे कोटेशन वाटप करण्यात आले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की,ऊर्जा खाते हे दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणारे खाते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वीज पुरवठा करतांना तो नियोजनबद्ध व शेतकऱ्यांच्या हिताचा असावा. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानाकडेही महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे. शेतकऱ्यांसाठी व जिल्ह्याच्या विकासासाठी जे-जे चांगले आहे त्यांच्या पाठीशी पालकमंत्री म्हणून खंबीरपणे उभे असल्याचे यावेळी ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत महाराष्ट्र शासन व महावितरण कंपनिच्यावतीने महा कृषी ऊर्जा अभियानाअंतर्गत दरवर्षी एक लाख याप्रमाणे सौरकृषी पंप देण्याचे धोरण आहे. या धोरणाचा प्रारंभ मंगळवारी (दि.२६) करण्यात आला आहे. याच अभियानाअंतर्गत शेतकरी प्रकाश तायडे चिखलगाव, सुधाकर वाहूरवाघ (साहित-अकोला), शंकर पालवे(पोपटखेड), योगेश केसळे (मुर्तीजापुर) आणि मदन पांडे (निंभी बार्शिटाकळी) अशा पाच शेतकऱ्यांना सौर कृषी पंप कोटेशनचे वाटप करण्यात आले.

याचबरोबर शासनाच्या वतीने ‘कृषी पंप वीज जोडणी धोरण – २०२०’ राबविण्यात येत असून या धोरणात अनाधिकृत वीज जोडण्या अधिकृत करणे, तात्काळ नविन वीज जोडणी देणे,तसेच कृषीपंपाच्या थकबाकीवर 67 टक्क्यापर्यंत माफी देऊन वसूल झालेल्या वीज बिलाच्या ६६ टक्के रक्कम ही त्या जिल्ह्याची वीज यंत्रणा सक्षमीकरणाकरीता वापरण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सुत्र संचालन अशोक पेठकर यांनी केले.

एस.पी. केनेकर यांचा पालक मंत्र्याच्या हस्ते सन्मान

अकोला तालुक्यातील (पांढरी खरप) येथील अंध शेतकरी, केशराव भिमराव गायकवाड यांना वीज जोडणी देण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल अकोला ग्रामीण उप विभागाचे उप कार्यकारी अभियंता एस.पी.केनेकर यांना पालकमंत्री ना. कडू यांनी सन्मान केला.

Tags: कृषी पंप वीज जोडणी धोरण- २०२०
Previous Post

प्रियकराचा अल्पवयीन प्रियसी सोबत लग्नासाठी अट्टाहास… पोलीस ठाण्यातच घेतला प्रियकराने विषाचा घोट

Next Post

सिरम इन्स्टिट्युट, पुणे दुर्घटनेतील दिवंगत अभियंता महेंद्र इंगळे यांच्या कुटुंबियांना पालकमंत्र्यांची सांत्वनपर भेट

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
सिरम इन्स्टिट्युट, पुणे दुर्घटनेतील दिवंगत अभियंता महेंद्र इंगळे यांच्या कुटुंबियांना पालकमंत्र्यांची सांत्वनपर भेट

सिरम इन्स्टिट्युट, पुणे दुर्घटनेतील दिवंगत अभियंता महेंद्र इंगळे यांच्या कुटुंबियांना पालकमंत्र्यांची सांत्वनपर भेट

प्रहार नेते तुषार पुंडकर हत्याकांडप्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती !

प्रहार नेते तुषार पुंडकर हत्याकांडप्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती !

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.