अकोला – पिंपळगाव चांभारे ता. बार्शिटाकळी येथील सुरेश बाबाराव सुरडकर यांच्या परसातील पोल्ट्री फार्म मधील पाठविण्यात आलेल्या पक्षांचा अहवाल H5N1 पॉझिटिव्ह आल्याचे कळविले आहे. तसेच या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होवू नये यासाठी सुरेश बाबाराव सुरडकर यांचे पोल्ट्री फार्मपासून 10 किमी त्रिज्या परिसर सतर्क क्षेत्र घोषित करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत. तरी नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले.
सतर्कतेचा आदेश निर्गमित –
मौजे पिंपळगाव चांभारे ता. बार्शिटाकळी येथील सुरेश बाबाराव सुरडकर यांचे परसातील कुक्कूट क्षेत्रापासून एक कि.मी.चा परिसर हा बाधीत क्षेत्र व 10 कि.मी. परिसर हा निगराणी क्षेत्र ( Alert Zone) म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या बाधित क्षेत्रातील सर्व कुक्कूट पक्षांची तसेच निगडीत खाद्य व अंडी यांचीही शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याबाबत जलद कृती दलास यांना आदेशित करण्यात येत आहे, यासाठी प्रसार प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यासाठी तालुका निहाय समिती उपविभागीया अधिकारी यांच्या अध्यक्षेतेखाली तयार करण्यात आली आहे. समितीत असलेल्या सदस्यांनी आपल्यावर असलेली जबाबदारी योग्य रितीने हाताळून प्रतिबंधात्मक योजना करण्यात यावे, असे आदेशीत केले आहे.
परिसरातील कुक्कूट शेड निर्जंतुकीकरण करुन 10 कि.मी. त्रिज्यतील परिसरात कुक्कूट पक्षांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा प्रदर्शन करण्यास पुढील 21 दिवस होईपर्यंत प्रतिबंध करण्यात येत आहे, बाधित क्षेत्रापासून 10 कि.मी. त्रिज्येतल परिसर अवागमन प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात येत आहे. बर्ड फ्लू मधील तरतूदीनुसार सर्व यंत्रणांनी निश्चित करण्यात आलेल्या जबाबदारीप्रमाणे कार्यवाही करावी. सदर आदेश मंगळवार(दि.26) पासून लागू राहतील, असे आदेशात नमूद केले आहे.