अकोला – ३२ व्या रस्ते सुरक्षा अभियानानिमित्त उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला यांच्यावतीने वाहन चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोलाचे नेत्रचिकित्सा अधिकारी ए.आर.रहमान, आर.बी.तायडे, व्ही.एन.अरबट तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक समीर ढेंबरे व वाहन चालक मोहम्मद अतहर यांनी लांब पल्ल्याच्या वाहनाच्या वाहन चालकांची नेत्रतपासणी करून त्यांना उपचारांबाबत मार्गदर्शन केले. तसेच डोळ्यांची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी परराज्यातील वाहन चालकांनीही या शिबिराचा लाभ घेतला.