तेल्हारा – सरपंच सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 22जानेवारी 2021 रोजी शिर्डी येथे संपन्न झाला बाबासाहेब पावसे पाटील संगमनेर संस्थापक सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश च्या नेतृत्वाखाली झाला यावेळी पुरस्कार वितरण सोहळ्यास समाजप्रबोधन निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे सामाजिक कार्यकर्ते यादवराव पावसे भाऊ मरगळे विक्रम भोर, प्रमुख उपस्थितीत दमदार सोहळा संपन्न झाला.
यावेळी दैनिक अजिंक्य भारत चे तेल्हारा तालुका प्रतिनिधी विलास मुरलीधर बेलाडकर यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकारीता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मराठी भाषेतल्या पत्रकारितेत गेली पंधरा वर्षे विशेष योगदान दिल्याबद्दल विलास बेलाडकर यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष यादवराव पावसे खासदार सदाशिवराव लोखंडे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याळी सत्काराला उत्तर देताना “पत्रकारितेचा मुळ आवाज कुठेतरी दाबला जातोय,त्याला पुन्हा एकदा मोकळा करण्याची गरज आहे. पत्रकारीता मुठभर माध्यमसम्राटांच्या हातातील बाहुल होऊ द्यायच नसेल तर मजबूत पत्रकारांची साखळी उभारून सोशल मीडियाच्या माध्यमातून चळवळ उभारण्याची गरज आहे” असं मत बेलाडकर यांनी व्यक्त केलंय.
यावेळी राज्यातील नवोदित साहित्यिक, लेखक, कवी, कथाकार आणि साहित्याचे चाहते यांची खास उपस्थिती होती तसेच
पुरस्कारांमध्ये आदर्श पत्रकार यांच्यासह आदर्श सरपंच,उद्योग भूषण, ,युवारत्न, प्रशासकीय सेवा,सामाजिक, शैक्षणिक, कोरोना योध्दा,मीडिया, कृषी,व्यापार,कला, राजकिय,महसूल,वैद्यकीय,आध्यत्मिक, ऐतिहासिक,दिव्यांग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानीत करण्यात आले.हा सन्मान सोहळा सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळून संपन्न झाला असून यावेळी संस्थापक यादवराव पावसे,अध्यक्ष भाऊ मरगळे,राज्यध्यक्ष विक्रम भोर,मार्गदर्शक जयदीप वानखेडे, राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे,स्वागताध्यक्ष प्रदीप हासे,कार्याध्यक्ष रवींद्र पवार, शंकरराव खेमनर,भाग्यश्री नरवडे,अँड भाऊसाहेब गुंजाळ,पंकज चव्हाण, रविराज गाटे, गणेश तायडे,अंनत ऊर्फ बाळासाहेब निकम यांची उपस्थिती होती.