अकोला (प्रतिनिधी)- डिजिटल क्रांती मुळे युवक, विद्यार्थी यांचा वाचना कडील ओढा दिवसेंदिवस कमी होत असून त्यामुळे आपली असलेली परंपरा व संस्कृती नष्ट होण्याची भीती आहे , ज्ञान, विज्ञानाच्या या युगात प्रगतीच्या आधुनिक साधना सोबतच आपली संस्कृती, साहित्य, कला,परंपरा जोपासण्याची नितांत गरज आहे या साठी वाचन संस्कृती वाढविण्याची गरज आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार ,किसान ब्रिगेड चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी व्यक्त केले.
अकोला येथील युवा लेखक संतोष तुकाराम पाटील यांनी लिहिलेल्या शुद्ध लेखन व आस्वाद या दोन पुस्तकांचे प्रकाशन प्रकाश पोहरे यांचे हस्ते निशांत टॉवर येथील त्यांच्या कार्यालयात करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते , अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिरसाहेब यावेळी उपस्थित होते , ग्रंथ, पुस्तके, वृत्तपत्र वाचनातून नवीन ज्ञान, माहिती व नित्याच्या घडामोडींची अद्यावत माहिती मिळते त्यामुळे वाचनाची सवय वाढण्याची गरज आहे असे प्रकाश पोहरे यांनी सांगितले , संतोष पाटील यांनी लिहिलेल्या दोन्ही पुस्तकांची त्यांनी प्रशंसा केली व शुभेच्छा दिल्या , संतोष पाटील यांनी दैनंदिन कामासोबत च लिहिण्याचा छंद जोपासला आहे ही उल्लेखनीय बाब असल्याचे पत्रकार मिरसाहेब यांनी सांगितले.