अकोला – जिल्ह्यात सन २०२० ते २०२५ दरम्यान गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तहसिलस्तरावर सोमवार दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत होणार आहे. त्यात सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढुन निश्चित करण्यात येईल. तर सरपंचपदाच्या महिला आरक्षणाची सोडत बुधवार दि.३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून छत्रपती सभागृह, नियोजन भवन येथे होणार आहे. या ठिकाणी होणारा सोडत क्रम याप्रमाणे असेल- अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, मुर्तिजापूर, बार्शी टाकळी आणि अकोला या प्रमाणे.
तालुकानिहाय सरपंचपदांचा आरक्षण तपशिल याप्रमाणे-
तेल्हारा- एकुण ग्रामपंचायती ६२ पैकी अनुसूचित जाती १४, अनुसूचित जमाती सहा, नागरिकांचा मागासप्रवर्ग १७ आणि सर्वसाधारण २५.
अकोट- एकुण ग्रामपंचायती ८४ पैकी अनुसूचित जाती १६, अनुसूचित जमाती १२, नागरिकांचा मागासप्रवर्ग २३ आणि सर्वसाधारण ३३.
मुर्तिजापूर- एकुण ग्रामपंचायती ८६ पैकी अनुसूचित जाती २२, अनुसूचित जमाती तीन, नागरिकांचा मागासप्रवर्ग २३ आणि सर्वसाधारण ३८.
अकोला- एकुण ग्रामपंचायती ९७ पैकी अनुसूचित जाती २८, अनुसूचित जमाती आठ, नागरिकांचा मागासप्रवर्ग २६ आणि सर्वसाधारण ३५.
बाळापूर- एकुण ग्रामपंचायती ६६ पैकी अनुसूचित जाती २१, अनुसूचित जमाती दोन, नागरिकांचा मागासप्रवर्ग १८ आणि सर्वसाधारण २५.
बार्शी टाकळी- एकुण ग्रामपंचायती ८० पैकी अनुसूचित जाती १२, अनुसूचित जमाती सहा, नागरिकांचा मागासप्रवर्ग २२ आणि सर्वसाधारण ४०.
पातूर- एकुण ग्रामपंचायती ५७ पैकी अनुसूचित जाती १२, अनुसूचित जमाती आठ, नागरिकांचा मागासप्रवर्ग १५ आणि सर्वसाधारण २२.
नागरिकांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी आरक्षण सोडतीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.