पुणे : कोरोना लस बनवणाऱ्या पुण्याच्या सीरममध्ये लागली आग लागली आहे. कोरोनावर लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटला भीषण आग लागली आहे. हडपसर जवळील गोपाळ पट्टीतील असणाऱ्या सिरमच्या प्लांटला ही आग लागली आहे. अग्निशामक दालाच्या फायरगाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत.
कोरोना संसर्गावर लस तयार करणार्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग लागल्याची घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास घडली. मांजरीच्या बाजूकडे असलेल्या मागील गेटच्या बाजूला नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीच्या दुसर्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती आहे.
सीरम इन्स्टिट्यूमधील कर्मचार्यांनी आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दिली होती. त्यानंतर 10 अग्निशमन दलाच्या गाड्यासह जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दिली आहे. मात्र आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली हे समजू शकलेले नाही.
दरम्यान, सीरमकडून आलेल्या स्पष्टीकरणानुसार कोरोना तयार होत असलेल्या कोव्हिशिल्ड ठिकाणी कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. कोरोना लसी कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे सीरम इन्स्टिट्यूटने म्हटले आहे. अग्नीशमन दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या मजल्यावरून धुराचे लोट मोठ्या प्रमाणात येताना दिसत आहेत. आतापर्यंत तीन लोकांना वाचविण्यात आले आहे. दरम्यान, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आग मोठ्या प्रमाणावर आहे.