मुंबई: महाराष्ट्र पोलिस दलातील पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांना “आयर्न मॅन किताब” मिळाला आहे. त्यांच्या नावाचा समावेश “वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड, लंडन” मध्ये आज करण्यात आला आहे. त्यांचे देशाभरातून कौतुक हेत आहे.
कृष्णप्रकाश हे १९९७ बॅचचे आयपीएस आहेत. महाराष्ट्र पोलिस दलातील एक डॅशिंग, कणखर पण तितकेच संवेदनशील, कायद्यासोबत अध्यात्मिक व संत साहित्यावर प्रचंड पगडा अशी त्यांची ओळख आहे. ते सध्या पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
भारतीय प्रशासकीय सेवेतील आयपीएस – आयएएस, संरक्षण दल, आर्म फोर्स, सनदी, पॅरामिलिटरीमधील वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणारे आयुक्त कृष्ण प्रकाश हे देशातील पहिलेच अधिकारी ठरले आहेत. या गौरवास्पद कामगिरीकरिता वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड्स लंडनचे सचिव अनुराग पांडेय, सचिव डॉ. प्रदीप मिश्रा यांच्या हस्ते कृष्ण प्रकाश यांना प्रमाणपत्र देण्यात आले. (Iron Man Book to IPS officer Krishnaprakash)
ब्रिटीश संसदचे सदस्य वीरेंद्र शर्मा, आलोक शर्मा, वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड्स इंग्लंडचे चेअरमन डॉ. दिवाकर सुकुल व वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड्स इंग्लंडचे भारतातील अध्यक्ष तथा दिल्ली उच्च न्यायालयातील वकील ॲड. संतोष शुक्ला आदींनी आयुक्त कृष्ण प्रकाश यांना हा बहुमान मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.