अकोला – राज्य शासनातर्फे दिले जाणारे विविध क्रीडा पुरस्कारांच्या नियमावलीत सुधारणा करता याव्या यासाठी क्रीडा क्षेत्रातील विविध जाणकार, खेळाडू, क्रीडा संघटना इ. कडुन सुचना व अभिप्राय मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी कळविले आहे.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक , जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती खेळाडू, साहसी, दिव्यांग खेळाडू पुरस्कार शासनामार्फत देण्यात येतात. या संदर्भात दि.२४ जानेवारी २०२० रोजीच्या शासन निर्णयात नियमावली देण्यात आली आहे. या नियमावलीत सुधारणा करणे प्रस्तावित आहे. या सुधारणांबाबत खेळाडू, नागरिक, क्रीडा संघटना, संस्था, क्रीडा पुरस्कारार्थी यांच्याकडून शुक्रवार दि.२२ पर्यंत सुचना व अभिप्राय मागविण्यात आले आहेत. प्रस्तावित नियमावली ही शासनाच्या क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आपल्या प्रस्तावित सुधारणांबाबतच्या सुचना व अभिप्राय [email protected] किंवा [email protected] या इ-मेलवर दि.२२ पर्यंत पाठवाव्या असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, अकोला यांच्या कार्यालयाशीही संपर्क साधता येईल,असे जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी कळविले आहे.