अकोला- कोरोनाची लस अकोल्यात दाखल झाली. असुन अकोल्यासाठी 9 हजार लसचे नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा येथे जिल्हा औषधी व लस भांडारात जमा करण्यात आले आहे. सदर व्हक्सीन 2 ते 8 डिग्री तापमानात ठेवण्यात आले आहे. लस सुरक्षतेत इतरत्र जिल्ह्यात पाठविण्यात येणार आहे.
16 जानेवारी रोजी देण्यात येणा-या कोरोना लसीकरणाची तयारी करण्यात आली असुन ही लस आरोग्य कर्मचा-यांना प्रथम देण्यात येणार आहे. जिल्ह्यात 16 तारखेला जिल्हा स्त्री रूग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आर्बिट हॉस्पीटल येथे आरोग्य विभागातील कर्मचा-यांना लसीकरण करण्यात येणार आहे. एका सेंटर वर 100 जणांना लसीकरण करण्यात येणार असुन एका दिवसात 300 लोकांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यापुढील नियोजन वेळोवेळी येणा-या सुचनेप्रमाणे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी दिली. यासाठी आरोग्य विभागाचे उपसंचालक