अकोला – मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे पत्रानुसार दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादी चा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. दिनांक 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येतो. त्यापूर्वी मतदार यादी अंतिमरित्या प्रसिध्द करावी अशा पध्दतीने सदर कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.
मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे निर्देश आहेत की, मतदार यादीमध्ये मतदारांचे छायाचित्रे नाहीत व मतदार ओळखपत्र क्रमांक नाही अशा मतदारांचा त्या यादीभागातील मतदानकैंद्रस्तरीय अधिकारी, (BLO) यांचेमार्फत शोध घेवून छायाचित्रे गोळा करावीत व त्यांची मतदार यादी अदयावत करावी. जे मतदार त्या भागात राहत नाहीत किंवा आढळून आले नाहीत अशा मतदारांचे बाबतीत रितसरकार्यवाही करुन नावे कमी करण्यात यावी. त्यानुसार 31 अकोला पूर्व विधानसभा मतदार संघातील सर्व मतदानकेंद्रस्तरीय अधिकारी, यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन छायाचित्र नसलेल्या तसेच वगळणीस पात्र असलेल्या मतदारांचीयादी तयार करुन सादर केली आहे.
31 अकोला पूर्व विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 17303 मतदारांचे अयाचित्रे मतदार यादीमध्ये नाहीत या सर्व मतदारांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, ज्या मतदारांचे मतदार यादीमध्ये त्यांचे नावासमोर छायाचित्रे नाहीत व वगळीस पात्र आहेत अशा मतदारांचे नावाची यादी संबंधीत मतदान केंद्रावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला यांचे www.akola.nic.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे तरी सदह फोटो नसलेल्या व वगळणीस पात्र असलेल्या यादीमध्ये ज्या मतदाराचे नाव आहे त्यांनी आपले छायाचित्र दोन दिवसाचे आत संबंधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, यांचेकडे जमा करावीत अन्यथा मतदार यादीमधून नाव कमी करण्यात येईल याची कृपया नोद घ्यावी.असे उपविभागीय अधिकारी, तथा मतदार नोंदणी अधिकारी,
31-अकोला (पूर्व) विधानसभा मतदार संघ यांनी कळविले आहे.