अकोला – जिल्ह्यातील 225 ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रीक निवडणुक कार्यक्रमाप्रमाणे दि. 15 जानेवारी 2021 रोजी मतदान व दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे.
आचार संहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व निवडणुका कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याच्या दृष्टीकोनातुन तसेच निवडणूका ह्या खुल्या व निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत हदीतील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुक असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहे.
ग्रामपंचायत निवडणूक- 2020- मतदानाचा आधीचा दिवस अनुज्ञप्ती बंद ठेवण्यासाठी तारीख कोरडा दिवस व वेळ –दिनांक 14 जानेवारी 2021 (संपुर्ण दिवस) मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्यासाठीचे घोषित कार्यक्षेत्र – अकोला जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदान आहे त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या.
ग्रामपंचायत निवडणूक- 2020- मतदानाचा दिवस अनुज्ञप्ती बंद ठेवण्यासाठी तारीख कोरडा दिवस व वेळ –दिनांक 15 जानेवारी 2021 (संपुर्ण दिवस) मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्यासाठीचे घोषित कार्यक्षेत्र – अकोला जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदान आहे त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या.
ग्रामपंचायत निवडणूक- 2020- मतमोजणीचा दिवस अनुज्ञप्ती बंद ठेवण्यासाठी तारीख कोरडा दिवस व वेळ –दिनांक 18 जानेवारी 2021 (संपुर्ण दिवस) मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्यासाठीचे घोषित कार्यक्षेत्र – अकोला जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूका आहेत. त्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील अनुज्ञप्त्या.
ग्रामपंचायत निवडणूक- 2020- मतमोजणीचा दिवस अनुज्ञप्ती बंद ठेवण्यासाठी तारीख कोरडा दिवस व वेळ –दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी संपेपर्यंत मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्यासाठीचे घोषित कार्यक्षेत्र – त्या तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी आहे त्या स्थानिक स्वराज्य सस्थांच्या हदीतील मद्यविक्री अनुज्ञप्त्या.
सर्व मद्यविक्री अनुज्ञप्तीधारक मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती बंद ठेवाव्यात. सदर आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात यावे. सदर आदेशाचे उल्लघंन करणा-या अनुज्ञप्तीधारकांवर मुंबई दारूबंदी कायदा 1949 अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.