तेल्हारा (प्रतिनिधी)- दिनांक 8 जानेवारी ते 12 जानेवारी पर्यंत चाललेल्या सेठ बंसीधरजी झुनझुनवाला जयंती उत्सवाचा समारोप आज मंगळवार दिनांक 12 जानेवारी ला संस्थेच्या प्रांगणात पार पडला सोबतच राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.बेनीप्रसादजी झुनझुनवाला व संचालक मंडळातील सर्व सदस्यांनी राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद व स्व.सेठ बंसीधरजी झुनझुनवाला यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले.
जयंती उत्सव चे औचित्य साधून याप्रसंगी गरजू अपंग व्यक्तींना अध्यक्ष व संचालक मंडळाच्या हस्ते व्हिलचेअर व सायकलचे मोफत वाटप करण्यात आले. तेल्हारा येथील कैलास पडोळे दहीगाव येथील विशाल गवळी व वारखेड येथील सतीश खंडेराव यांना व्हीलचेअर व सायकल देण्यात आली रक्तदान शिबिर मधील रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. जयंती उत्सव दरम्यान रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धे मधील विजयी विद्यार्थ्यांना मा.अध्यक्ष व संचालक मंडळातर्फे विजयी चषक व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला शिक्षकांसाठी सेठ बंसीधर प्राथमिक विद्यालय विरुद्ध सेठ बंसीधर माध्यमिक विद्यालय मध्ये क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता यामध्ये सेठ बंसीधर प्राथमिक विद्यालयाचे चमू विजयी ठरले शिक्षीकांसाठी संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री.बेनीप्रसादजी झुनझुनवाला उपाध्यक्ष श्री.विलासरावजी जोशी व व्यवस्थापक श्री गोपालदासजी मल्ल कोषाध्यक्ष श्री.विठ्ठलराव खारोडे संचालक श्री.डॉ. विक्रमजी जोशी श्री.विष्णूभाऊ मल्ल संचालिका सौ. अश्विनीताई खारोडे श्री.ओमप्रकाशजी झुनझुनवाला सेठ बंसीधर विद्यालयाचे प्राचार्य श्री.राजेंद्रकुमारजी देशमुख व उपमुख्याध्यापक श्री.नंदकिशोरजी शर्मा पर्यवेक्षक श्री.गोपालजी फाफट प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आशिषजी अग्रवाल स्वामी विवेकानंद चे प्राचार्या सौ.रंजनाताई भागवत माजी प्राचार्य श्री.मनोहरराव राऊत श्री.अशोकराव आमले श्री.सत्यनारायणजी दोदराजका श्री.दिगंबरजी शेरेकर इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मुकुंदजी सोनिकर यांनी तर आभार प्रदर्शन श्री.नंदकिशोरजी शर्मा यांनी केले.