• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 10, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

‘न भूतो न भविष्यति’ : ७३ वर्षांत प्रथमच केंद्रीय अर्थसंकल्प पेपरलेस असणार

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
January 12, 2021
in राष्ट्रीय, Featured
Reading Time: 1 min read
79 1
0
७३ वर्षांत प्रथमच केंद्रीय अर्थसंकल्प पेपरलेस असणार
14
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली: यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प ‘न भूतो न भविष्यति’ असाच राहणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा छापील अर्थसंकल्पाची परंपरा मोडून तो सॉफ्टकॉपीच्या माध्यमातून वाचून दाखविण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारतर्फे सोमवारी स्पष्ट करण्यात आले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७३ वर्षांत प्रथमच अर्थसंकल्पाची छपाई करण्यात येणार नाही. अर्थसंकल्प सॉफ्टकॉपीमध्ये सादर करण्याच्या केंद्राच्या प्रस्तावाला लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींनी मान्यता दिली आहे.

त्यामुळे यंदा ७३ वर्षांत प्रथमच संसदेच्या बाहेर अर्थसंकल्पाचे दस्तावेज पोहोचविणारे ट्रक दिसणार नाहीत. दर वर्षी केंद्रीय अर्थसंकल्पाची छपाई अर्थमंत्रालयाच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये होते. अर्थसंकल्पाशी संबंधित दस्तावेजांच्या छपाईसाठी शंभरहून अधिक कर्मचारी दोन आठवड्यांहून अधिक कालावधी एकत्रच व्यतीत करतात. मात्र, यंदा करोनाचे सावट असल्याने इतक्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येणे शक्य नसल्याने अर्थसंकल्प छापण्याऐवजी सॉफ्टकॉपीद्वारा वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

पेपरलेस अर्थसंकल्प

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाचा अर्थसंकल्प सदस्यांनी सॉफ्टकॉपीमध्ये स्वीकारावा, यासाठी लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना त्यांची खूपच मनधरणी करावी लागली. तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यात अडचण येणाऱ्या सदस्यांसाठी मर्यादित स्वरूपात छापील अर्थसंकल्प देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, छापील अर्थसंकल्पाचे वितरण आणि वाहतूक यांमध्ये करोनाचे संक्रमण होण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त करण्यात आल्याने अखेर सॉफ्टकॉपीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांतील ७५० सदस्यांना यंदा सॉफ्टकॉपीद्वारे अर्थसंकल्पाची प्रत वितरित करण्यात येणार आहे.

दर वर्षी अर्थसंकल्प छपाईला जाण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री, अर्थराज्यमंत्री आणि अर्थमंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पारंपरिक हलवा सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. मात्र, यंदा अर्थसंकल्प छापील नसल्याने हा सोहळा होणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे. अर्थसंकल्प छपाईला गेल्यानंतर तो संसदेत सादर होईपर्यंत अर्थमंत्रालयाचे कर्मचारी नॉर्थ ब्लॉकमधील छपाईखान्यात स्वत:ला बंद करून घेतात. यंदा मात्र, ही प्रक्रिया होणार अथवा नाही याबाबत तर्कवितर्कांना ऊत आला आहे.

सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्प

अर्थसंकल्प संसदेत सादर झाल्यानंतर “www.Indiabudget.gov.in” आणि “www.indiabudget.nic.in” या वेबसाइटवर तो सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Tags: budget 2021Paperless budgetअर्थसंकल्पकेंद्रीय अर्थसंकल्पपेपरलेस अर्थसंकल्प
Previous Post

तेल्हारा येथे राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी

Next Post

ड्रोन मोजणी प्रकल्पाद्वारे गावठाणातील मालमत्तेचे सर्वेक्षण जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकरद्वारे खापरवाडा येथे शुभारंभ

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
drone survey

ड्रोन मोजणी प्रकल्पाद्वारे गावठाणातील मालमत्तेचे सर्वेक्षण जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकरद्वारे खापरवाडा येथे शुभारंभ

जिल्हा प्रशासनाचे वतीने राजमाता जिजाऊ मॉसाहेब व स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन

जिल्हा प्रशासनाचे वतीने राजमाता जिजाऊ मॉसाहेब व स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.