अकोला(प्रतिनिधी)– दहशतवाद विरोधी पथक आकोला अवैध धंद्यावर रेड करण्याकामी खदान परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मा. पो नी विलास रमेश पाटील साहेब यांना गुप्त बातमी दाराकडून खात्रीलायक बातमी मिळाली की सरकारी गोदाम च्या मागच्या बाजूला एका मोकळ्या मैदानात काही लोक वरली जुगार खेळत आहे. तिथे रेड केली असता तीन आरोपी अटक करण्यात आले.
१) राम जयराम खंडारे वय ४६ रा हिंगणा फाटा
२) रवी सिंग बलवीर सिंग टांग वय २७ रा सरकारी गोदामाच्या मागं खदान
३) अतुल विठ्ठल राम नरोटे वय ४८ रा दत्त कॉलनी व मोटरसायकल सह एकूण २१५१० रुपय मुद्देमाल जप्त करून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.