तेल्हारा – स्व. सेठ बंसिधर झुनझुनवाला यांच्या जयंती उत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन विद्यालयाच्या सभागृहात सोमवार दिनांक 11 जानेवारीला करण्यात आले या रक्तदान शिबिराला शहरांमधून व परिसरांमधून भरपूर प्रतिसाद मिळाला विशेष म्हणजे नवयुवक व नवयुवतींनी या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष बेनीप्रसाद झुनझुनवाला यांच्या हस्ते सरस्वती माता व स्व सेठ बंसिधर झुनझुनवाला यांच्या प्रतिमेचे पूजन व हारअर्पण करण्यात आले यावेळेस संस्थेचे उपाध्यक्ष श्री विलास जोशी व्यवस्थापक गोपालदास मल्ल कोषाध्यक्ष विठ्ठल खारोडे संचालक विष्णु मल्ल संचालक विक्रम जोशी संचालिका अश्विनी खारोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रक्त संकलन करण्यासाठी शासकीय मेडिकल कॉलेजचे डॉ. सरिता गोरे, शालिग्राम गिरे व वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते तेल्हारा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तापडिया यांनी रक्तदान शिबिराला या वेळेस भेट दिली प्राचार्य राजेंद्रकुमार देशमुख उपमुख्याध्यापक नंदकिशोर शर्मा पर्यवेक्षक श्री गोपाल फाफट उपस्थितांचे स्वागत केले रक्तदान शिबिरामध्ये 42 रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान हेच श्रेष्ठदान या उक्तीप्रमाणे महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद जिल्हा अकोला च्या वतीने संस्थेच्या अध्यक्षांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येऊन रक्तदान सारखे पवित्र कार्य केल्याबद्दल शासकीय जिल्हा रक्तपेढीच्या डॉ. सरिता गोरे व शिल्पा तायडे सह चमूने संस्थेचे अभिनंदन केले व आभार मानले