तेल्हारा (प्रतिनिधी)- तालुक्यातील जस्तगाव येथील कु प्रतीक्षा रवींद्र खर्चे व वैशाली भीमराव तायडे ह्या दोन बारा वर्षीय दोन मुली 4 जानेवारी रोजी बेपत्ता झाल्या होत्या मुलींच्या नातेवाईक यांनी सदर मुली बेपत्ता झाल्याची माहिती काल रात्री तेल्हारा पोलीस स्टेशन ला दिली त्यावर पोलीस निरीक्षक दिनेश शेळके यांनी वेगाने तपास चक्रे फिरवून मुलींचा शोध घेण्यास सुरवात केली असता इतर पोलीस स्टेशन ला माहिती देऊन तपास त्या दिशेने सुरु केला सदर मुलींचा शोध घेण्यासाठी तेल्हारा पोलिसांची झोप उडाली होती अखेर आज तेल्हारा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे,पो कॉ विजय राजनकर व होमगार्ड मेंढे यांनी शेगाव इथे जाऊन शोधकार्य राबवले असता त्या मुली शेगाव येथिल बसस्थानक येथे सापडून आल्या अन पोलीस यंत्रणेचा जीव एकदा भांड्यात पडला सदर दोन्ही बेपत्ता झालेल्या मुली ताब्यात घेऊन त्यांचे आई-वडिलांचे ताब्यात देण्यात आले.तेल्हारा पोलिसांच्या कामगिरी बाबत ठाणेदार दिनेश शेळके व त्यांच्या संपूर्ण टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे