मुंबई : देशातील प्रमुख टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने मोठी घोषणा करत ग्राहकांना ‘न्यू इयर गिफ्ट’ दिले आहे. उद्यापासून म्हणजेच १ जानेवारीपासून जिओच्या ग्राहकांना मोफत लोकल व्हॉइज कॉल्स करता येणार आहेत.
काही महिन्यांपूर्वीच रिलायन्स जिओने इतर नेटवर्कवर कॉल केल्यास पैसे आकारण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी अनेक प्लानदेखील लॉन्च केले होते. जिओने आयुसी म्हणजेच पूर्णपणे बंद केले आहेत. त्यामुळे जिओ ग्राहकांना आता कोणत्याही नेटवर्कवर विनामूल्य कॉलिंग करता येणार आहे. यासंदर्भात रिलायन्स जिओने आज म्हणजेच गुरुवारी माहिती दिली.
रिलायन्स जिओच्या ग्राहकांनी दुसऱ्या नेटवर्कवर फोन केल्यास त्यासाठी पैसे आकारण्याचा निर्णय कंपनीनं सप्टेंबर २०१९ मध्ये घेतला होता. यासाठी कंपनीने ट्रायच्या आयसीयू शुल्काचा संदर्भ दिला होता. आता ट्रायनं आयसीयू शुल्क आकारणी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रिलायन्स जिओने लोकल ऑफनेट कॉल्स मोफत असतील, अशी घोषणा केली. याचा लाभ ग्राहकांना उद्यापासून घेता येईल.