अकोला- ग्राम पंचायत निवडणूक तसेच नाताळ व नववर्षाचे अनुषंगाने अवैध मद्यविक्रीस आळा घालण्यासाठी अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अकोला या कार्यालयाकडून दानापूर ता. तेल्हारा, माळसुळ व आलेगाव ता. पातुर, दुदलाम ता. अकोला तसेच पिंपळगाव चांभारे ता. बार्शिटाकळी येथे विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमे अंतर्गत आतापर्यंत सहा गुन्हे नोंदविण्यात आले असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अद्याप पर्यंत 38 हजार 895 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून हे धाडसत्र सुरु राहिल असे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक स्नेहा सराफ यांनी कळविले आहे.
दानापूर ता. तेल्हारा, माळसुळ व आलेगाव ता. पातुर, दुदलाम ता. अकोला तसेच पिंपळगाव चांभारे ता. बार्शिटाकळी याठिकाणी ही कारवाई आज करण्यात आली. या विशेष मोहीममध्ये मुंबई दारूबंदी कायदा 1949 च्या विविध कलमाखाली एकुण सहा गुन्हे नोंद करण्यात आले. या कारवाईत एकुण तीन आरोपीना अटक करून त्यामध्ये 4.5 लि. देशी दारू, हातभट्टी दारू 10 लि. व 1660 लि. मोहा रसायन असा एकुण 38 हजार 895 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्हा अन्वेषण कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, अकोला विभागाचे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, सहा.दुय्यम निरीक्षक, जवान, व जवान-नि-वाहनचालक यांनी सहभाग घेतला यापुढेही अवैध मद्यविक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क, अकोला विभागाचे धाडसत्र कार्यरत राहील,असे अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क, अकोला स्नेहा सराफ यांनी कळविले आहे.