• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

नायलॉन मांजानं कापला १२ वीच्या विद्यार्थ्याचा गळा

Team by Team
December 31, 2020
in Featured, विदर्भ
Reading Time: 1 min read
78 0
0
नायलॉन मांजानं कापला १२ वीच्या विद्यार्थ्याचा गळा
15
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

नागपूर  (शरद नागदिवे) :नागपुरात बाईकवरून क्लासला जात असतांना नायलॉन मांजा गळ्यात अडकल्यामुळे एका विद्यार्थ्याचा गळा कापला गेल्याने विध्यार्थी गंभीर जखमी झाला. व त्याला जखमी अवस्थेत खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

नायलॉन मांजावर बंदी असतानासुद्धा नागपूर शहरात मोठ्या धडाक्यात विक्री सुरू आहे. अनेकजण नायलॉन मांजानं पतंग उडवत आहेत. त्यामुळे अनेक अपघातही घडत आहेत. आदित्य संतोष भारद्वाज (वय-17) असे जखमी विद्यार्थ्याचं नाव आहे. गोधनी परिसरात राहणारा आदित्य हा 12 वीचा विद्यार्थी आहे. तो बाईकवरून क्लासला जात होता. तेव्हा ही घटना घडली.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

गोधनी-मानकापूर रोडवरील नायलॉन मांजा त्याच्या गळ्याला गुंडाळला गेला. दुचाकी वेगात असल्यामुळे गळा कापला गेला आणि तो गाडीवरून पडला आणि गंभीर जखमी झाला. आदित्यला नागरिकांनी तात्काळ गोधनी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला मानकापूर चौकातील अलेक्सिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आदित्यच्या गळा जास्तच चिरला गेल्याने तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे प्राण थोडक्यात बचावले. त्याची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे.

दरम्यान, राज्य सरकारनं 1986 पर्यावरण संरक्षण कायदा कलम 5 नुसार मांजाची विक्री व वापरावर बंदी घातली आहे. बंदी असतानाही बाजारपेठेत चायनीज व नायलॉन मांजाची धडाक्यात विक्री सुरू आहे. या घातक मांजावरील बंदी ही केवळ कागदावरच ठरत आहे. मकर संक्रांती दरम्यान बाजारपेठेत मांजा व पतंग खरेदीसाठी गर्दी झाली आहे. मात्र पतंग प्रेमींमध्ये चायना व नायलॉन मांजाची मागणी वाढली आहे.

गेल्यावर्षी देखील मांजामुळे अनेक अपघात झाल्यानंतरही यंदा या मांजाची मागणी होत आहे; परंतु हा मांजा नागरिकांसह पशुपक्ष्यांच्या गळ्याचा फास ठरत आहे. नागरिकांना चालताना किंवा वाहन चालवताना जीव मुठीत घेऊ न रस्त्याने जावे लागते. अनेक पक्षी, प्राणी, मनुष्य जखमी किंवा प्रसंगी मृत्युमुखी पडतात.

Tags: नायलॉन मांजा
Previous Post

शहर वाहतूक पोलिसांचा असाही प्रामाणिक पणा, रस्त्यावर पडलेला मोबाईल व पैशाचे पाकीट केले परत

Next Post

आता एमपीएसीची परीक्षा केवळ सहा वेळाच देता येणार

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
MPSC

आता एमपीएसीची परीक्षा केवळ सहा वेळाच देता येणार

भारतात कोरोना विषाणूच्या जनुकांमध्ये १९ प्रकारचे बदल! S:N440K जीनोमचा वेगाने प्रसार

लंडनहून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील अकोला शहरातील आठ पैकी सहा व्यक्ती पॉझिटीव्ह

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.